कांद्याच्या दरात घसरण स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी रस्त्यावर; पाहा व्हीडिओ…
कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. राहुरीमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी रस्त्यावर उतरली आहे.
राहुरी, अहमदनगर : मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात येतोय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्यात येतोय. कांद्याला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला.
Published on: Feb 28, 2023 11:37 AM
Latest Videos