धरण क्षेत्रात पावसाची उघडीप, पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम

धरण क्षेत्रात पावसाची उघडीप, पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम

| Updated on: Jul 15, 2022 | 12:33 PM

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील एक दिवस मुसळधारांची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल. कोल्हापूर शहरात धरण क्षेत्रात पावसाची उघडीप सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम आहे.

संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर कायम असून आणखी दोन दिवसांनी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक गावं पाण्याखाली आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांत गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार बरसत असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांनंतर ओसरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील एक दिवस मुसळधारांची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल. कोल्हापूर शहरात धरण क्षेत्रात पावसाची उघडीप सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाढ कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फूट 8 इंचावर आहे.

Published on: Jul 15, 2022 12:33 PM