Ayodhya Ram Mandir | अवघे काही तास… राम मंदिर रंगेबेरंगी फुलांनी सजलं, बघा कसा आहे माहोल?

| Updated on: Jan 20, 2024 | 11:40 PM

अयोध्येतही सर्वत्र या लोकार्पण सोहळ्याची लगबग सुरू असून संपूर्ण अयोध्या नगरीत राममय वातावरण झाले असून या सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. जेव्हा प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून आले तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. तशीच दिवाळी आता २२ जानेवारीला करण्यात येणार आहे.

अयोध्या, २० जानेवारी, २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. अयोध्येसह संपूर्ण राम मंदिरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतही सर्वत्र या लोकार्पण सोहळ्याची लगबग सुरू असून संपूर्ण अयोध्या नगरीत राममय वातावरण झाले असून या सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. जेव्हा प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून आले तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. तशीच दिवाळी आता २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. अयोध्या आणि श्रीराम यांच्याबाबत रामभक्तांच्या मनात असलेला आदर आणि नातं हे शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं ते श्रेष्ठ आहे. दरम्यान, प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराला आकर्षक आणि विविध रंगेबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्रीरामाच्या मंदिरातील सजावट केलेले मंदिराच्या आतील फोटो समोर आले आहे.

Published on: Jan 20, 2024 11:40 PM
Thane | बाबरी मशीद ते अयोध्या… 26 विविध रांगोळ्यांमधून प्रभू श्रीरामाचं उलगडलं चरित्र
Ayodhya Ram Mandir : प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, बघा कुणी काय दिलं भव्य अन् अनोखं दान?