अपघातानंतर तासभर मदतच न मिळलं ही बाब अत्यंत गंभीर- रामदास आठवले

अपघातानंतर तासभर मदतच न मिळलं ही बाब अत्यंत गंभीर- रामदास आठवले

| Updated on: Aug 14, 2022 | 12:39 PM

"अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर मदत मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती तर ते वाचू शकले असते. ही अत्यंत गंभीर बाब आहे", अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

“विनायक मेटेंचं अपघाती निधन हे मनाला चटका लावणारं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर मदत मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती तर ते वाचू शकले असते. ही अत्यंत गंभीर बाब आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. रविवारी पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. एक ते दोन तास त्यांना मदतच मिळाली नाही, असं चालकाने सांगितलं आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कंटेनरला डाव्या बाजूने जोरदारपणे धडकली असं प्रथमदर्शनी कळत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल.

Published on: Aug 14, 2022 12:39 PM