VIDEO : खारकीवमध्ये रशिया हवाई हल्ले करण्याची शक्यता-Russia Ukraine War

VIDEO : खारकीवमध्ये रशिया हवाई हल्ले करण्याची शक्यता-Russia Ukraine War

| Updated on: Mar 01, 2022 | 1:55 PM

रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय.

रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. खारकीवमध्ये रशिया हवाई हल्ले करण्याच्या तयारीमध्ये देखील आहे. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय. मिळालेल्या माहितीनुसार रशियानं ब्रिटन आणि जर्मनीसह 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंदी केली आहे. तर विविध रिपोर्टनुसार रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी उच्चस्तरिय बैठक घेतली. यात रशियाचे संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. ही बैठकीत पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिनमध्ये पार पडली.