VIDEO : The Kashmir Files टॅक्स फ्री करण्याची मागणी अयोग्य -Sanjay Raut

VIDEO : The Kashmir Files टॅक्स फ्री करण्याची मागणी अयोग्य -Sanjay Raut

| Updated on: Mar 17, 2022 | 2:19 PM

द काश्मीर फाइल्स या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट टॅक्स-फ्री करा म्हणणारे भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे.

द काश्मीर फाइल्स या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट टॅक्स-फ्री करा म्हणणारे भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली होती. त्यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून दिली. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल.