‘अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, आमच्याकडेही बघा’, संजय शिरसाट यांची नाराजी
आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पुन्हा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, थोडं आमच्याकडेही बघा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पुन्हा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, थोडं आमच्याकडेही बघा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. अतुल सावेंच्या वडिलांसोबत शिरसाट यांनी काम केलं. “मला कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्याबाबतची अपेक्षा मी बोलून दाखवली आहे”, असं शिरसाट यांनी याआधी म्हटलं होतं. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादचे संदिपान भूमरे, संजय शिरसाट, अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिंदे सरकारकडील मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तारांचा समावेश झाला आणि संजय शिरसाट यांचं नाव माघारी घेण्यात आलं.

मस्साजोगमधील ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित | VIDEO

पुणे अत्याचार प्रकरण; गुन्हेगारचा तपास लागलाय - पृथ्वीराज चव्हाण

स्वारगेट बलात्कार प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

संतोष देशमुखांची हत्या कोण लाईव्ह बघत होतं? बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
