Shivsena Political Crisis: शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत?

Shivsena Political Crisis: शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत?

| Updated on: Jul 11, 2022 | 1:26 PM

शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त आठच खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत.

शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त आठच खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारसुद्धा बंडाच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याआधी शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत एकनाथ शिंदेंचा वेगळा गट तयार केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. आता त्यानंतर शिवसेना पक्षाला आणखी मोठा धक्का मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.