AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 February 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 February 2022

| Updated on: Feb 13, 2022 | 2:54 PM

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही.

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून होणारे अमरण उपोषण  पुढे ढकलल्याचेही त्यांनी जाहीर केलं.

Published on: Feb 13, 2022 02:53 PM