VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 2 February 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 2 February 2022

| Updated on: Feb 02, 2022 | 11:56 AM

हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) भडकाऊ व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, असा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊचे तसे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी खोचक भाष्य केलं आहे.

ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात मुंबईतील धारावी येथे विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) भडकाऊ व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, असा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊचे तसे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी खोचक भाष्य केलं आहे. ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला भडकाऊ भाईजान म्हणत त्याची अटक आणि सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केले आहे. याआधीही ठोंबरे यांनी प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.