VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 September 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 30 September 2021

| Updated on: Sep 30, 2021 | 12:50 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात आहे. त्यावरून नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात.

Published on: Sep 30, 2021 12:49 PM