राज ठाकरेंच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा
देशातील हिंदूंनो तयार रहा. येत्या 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
देशातील हिंदूंनो तयार रहा. येत्या 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. भोंग्याचा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्याचा त्रास केवळ हिंदूंना नाही, तर मुस्लिमांनाही होतोय. हा विषय अनेक वर्षापासुन सुरू आहे, पण तसाच आहे. आता पुढे तुम्ही दिवसांतून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदी समोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असेही राज म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. एक मे रोजी औरंगाबादमध्ये आपली एक सभा होईल आणि आपण 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याचेही राज म्हणाले.
Latest Videos