VIDEO : Beed | विलीनीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांचे भाकरी थापून आंदोलन, संपकरी संतप्त

VIDEO : Beed | विलीनीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांचे भाकरी थापून आंदोलन, संपकरी संतप्त

| Updated on: Nov 27, 2021 | 1:21 PM

एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झाले आहेत.

एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने कर्मचारी आंदोलन करत आहेत. बीडमध्ये विलीनीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांचे भाकरी थापून आंदोलन करत  संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते.  राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं, तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनाअट पन्नास लाखांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.