अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 25, 2022 | 2:11 PM

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटात जाण्याच्या शक्यता खोतकरांनी नाकारल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा खोतकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे आणि त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. त्यामुळे खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे.