Grand Vitara Booking : विटाराला आवरा रे… 40 हजार बुकिंगचा धमाका, सप्टेंबरपासून डिलिव्हरीही सुरु होणार…

मारुती सुझुकी आपली ग्रँड विटारा सप्टेंबरमध्ये लॉंच करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनी सप्टेंबरमध्येच कारची डिलिव्हरी सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकातील बिदाडी येथेही मारुतीच्या विटाराचे प्रोडक्शनला सुरुवात करण्यात आली आहे.

Grand Vitara Booking : विटाराला आवरा रे... 40 हजार बुकिंगचा धमाका, सप्टेंबरपासून डिलिव्हरीही सुरु होणार...
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 10:36 AM

मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) पाईपलाईनमध्ये अनेक धमाकेदार गाड्यांचा समावेश आहे. पुढील सणासुदीचे दिवस बघता कंपनी अनेक आकर्षक व लेटेस्ट फिचर्सच्या कार्स ग्राहकांच्या भेटीला आणणार आहे. यात, मारुतीच्या एका अपकमिंग कारने सध्या बाजारात धमाका केला आहे. मारुती सुझुकी आपली ग्रँड विटारा (Grand Vitara) सप्टेंबरमध्ये लॉंच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी सप्टेंबरमध्येच कारची डिलिव्हरी सुरू करेल. कर्नाटकातील बिदाडी येथेही मारुतीच्या विटाराच्या प्रोडक्शनला (Production) सुरुवात झाली आहे. एका रिपोर्टनुसार, ग्रँड विटाराला आतापर्यंत तब्बल 40 हजार बुकिंग मिळाले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून कंपनी विटाराची डिलिव्हरी सुरू करणार आहे. सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहन कंपन्यांवर डिलिव्हरीसाठी वेटींगवर असलेल्या गाड्यांचा बोजा वाढत आहे. त्यामुळे कंपनी लवकरच वेटिंगवर असलेल्या वाहनांचा बोजा कमी करण्याचे नियोजन करीत आहे. एका अहवालानुसार, एकट्या मारुतीकडे 3.87 लाख युनिट्सचा बॅकलॉग आहे.

बलेनोच्या 38 हजार कार्स वेटिंगवर

कंपनीच्या एका अहवालानुसार, बलेनो हॅचबॅक कारच्या 38 हजार युनिट्सची डिलिव्हरीच कंपनीवर बोजा पडलेला आहे. नव्याने लाँच झालेली ब्रेझा कारही ग्राहकांकडून घेतली जात आहे. एकट्या ब्रेझाच्या 30 हजार युनिट्स कंपनीकडे वेटिंगवर आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत ?

मारुती ग्रँड विटाराची एक्सशोरूम किंमत 9.50 लाख रुपयांपासून सुरू होउन ती 18 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार ग्राहकांना दोन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध होत आहे. यात, माईल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड यांचा समावेश आहे. कंपनीने ही एसयूव्ही 6 ट्रिममध्ये लॉंच केली आहे. यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा प्लस हायब्रिड आणि अल्फा प्लस हायब्रिड यांचा समावेश आहे.

नऊ कलर्समध्ये उपलब्ध

कंपनीच्या म्हणण्यानुसार, 6 ट्रिम्ससह ही कार 9 वेगवेगळ्या कलर्समध्ये देखील उपलब्ध असेल. यामध्ये स्पेंड सिल्व्हर, नेक्सा ब्लू, ग्रँडनॉर ग्रे, आर्क्टिक व्हाइट, नेक्सा ब्लू आणि चेस्टनट ब्राउन यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.