Toyota HyRyder: टोयोटाच्या ‘या’ एसयुव्हीवर तब्बल 40 टक्के पेट्रोलची बचत करा, काय आहे खास?

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Toyota HyRyder लाँच केली आहे. कंपनीने मारुती सुझुकीसोबत मिळून या कारची निर्मिती केली आहे. ही एक हायब्रिड एसयुव्ही असून या कारच्या माध्यमातून तब्बल 40 टक्के पेट्रोलचा कमी वापर होत असल्याचा दावा केला जात आहे.

Toyota HyRyder: टोयोटाच्या ‘या’ एसयुव्हीवर तब्बल 40 टक्के पेट्रोलची बचत करा, काय आहे खास?
Toyota HyRyderImage Credit source: toyota
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 12:13 PM

टोयोटाच्या (Toyota Kirloskar) नव्या एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरवरुन (Toyota HyRyder) आता पडदा उठला आहे. या कारच्या स्पेसिफिकेशन्सबाबत ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून उत्सूकता होती. आता हा सस्पेंस संपला असून कंपनीने या कारची माहिती ग्राहकांसोबत शेअर केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, मात्र टोयोटाचे लक्ष हायब्रिड कारवरच अधिक दिसून येत आहे. कंपनीची ही कार हायब्रिड एसयूव्ही असून जबरदस्त मायलेज देणारी आहे. कंपनीने मारुती सुझुकीसोबत (Maruti Suzuki) मिळून या कारची निर्मिती केली आहे. ही एक हायब्रिड एसयुव्ही असून या कारच्या माध्यमातून तब्बल 40 टक्के कमी पेट्रोलचा वापर होत असल्याचा दावा केला जात आहे.

पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्र

या एसयूव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात टोयोटाची हायब्रिड कार टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे ही कार पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्हींवर चालते. इलेक्ट्रिक मोटर चालवण्यासाठी त्यातील इलेक्ट्रिक बॅटरी वेगळी चार्ज करावी लागत नसून ती स्वतःच चार्ज होते. ग्राहक ही कार ड्राइव्ह मोड आणि इलेक्ट्रिक वाहन मोडमध्ये चालवू शकता.

डिझाइन आणि लूक

टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरचा फ्रंट लूक अत्यंत आकर्षक आहे. याच्या फ्रंटला क्रिस्टल अॅक्रेलिक ग्रिल देण्यात आली आहे. मध्यभागी टोयोटा क्रोम फिनिश लोगो आहे, तर एलईडी डीआरएलमुळे आकर्षक लुक तयार झाला आहे. एसयूव्हीला हनीकॉम्ब लोअर ग्रिल, क्रोम फिनिश आणि एलईडी देण्यात आले आहे. मागील बाजूस, टोयोटाचा सिग्नेचर क्रोम लोगो आणि सी-आकाराचा एलईडी टेल लॅम्प आहे.

हे सुद्धा वाचा

40 टक्के पेट्रोलची बचत

या SUV मध्ये 1.5 लिटर K सिरीज इंजिन दिलेले आहे. असेच इंजिन मारुती ब्रेझामध्ये दिसले आहे. यासोबत सेल्फ चार्जिंग इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे, जेव्हा ही कार हायब्रिड मोडवर चालते तेव्हा ती नेहमीच्या एसयूव्हीपेक्षा 40 टक्के कमी पेट्रोल वापरत असल्याचा दावा केला जात आहे. ही हायब्रीड टेक्नोलोजी प्रथमच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये देण्यात आली आहे.

4×4 व्हील ड्राइव्हचा पर्याय

ग्राहकांना या कारमध्ये 2 व्हील आणि 4 व्हील ड्राइव्ह मोड्स मिळणार आहेत. त्याच सोबत ड्रायव्हर यासाठी ऑटो मोडदेखील सिलेक्ट करु शकतील. ही कार 17 इंच अलॉय व्हील्ससह उपलब्ध आहे. ही कार मारुतीच्या मदतीने तयार करण्यात आली असल्याने या कारमध्ये जी Maruti Brezza आणि Maruti Baleno मध्ये दिसत असलेले बरेच इंटीरियर सारखेच असणार आहेत. 360 डिग्री व्ह्यू पार्किंग कॅमेरा, मोठा फ्लोटिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि हेडअप डिसप्ले मिळणार आहे. यासोबतच अॅम्बियन्स मूड लायटिंगही देण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.