Volvo Car: आलिशान वोल्वो कारची किंमत तब्बल तीन लाखांनी वाढली! आता नेमकी किंमत किती? जाणून घ्या
व्होल्वो कार्स इंडियाने एक्ससी 40 अशा विविध मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत 3 टक्क्यांनी वाढून 44.5 लाख रुपये, एक्ससी 60.4 टक्क्यांनी वाढून 65.9 लाख रुपये, एस 90 ची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 65.9 लाख रुपये आणि एक्ससी 900 ची किंमत 3 टक्क्यांनी वाढून 93.9 लाख रुपये केली आहे.
कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ, जागतिक भूराजकीय अस्थिरता आणि निर्मिती खर्च वाढल्याचा फटका लक्झरी कार निर्मिती करणा-या कंपनीला ही बसला आहे. वाढत्या खर्चाला (input costs)तोंड देण्यासाठी लक्झरी कार निर्मिती करणा-या व्होल्वो कार्स इंडियाने (Volvo Cars India) त्यांच्या सर्व मॉडेल्स रेंजच्या किंमतीत तात्काळ वाढ केली आहे. या किंमतीत थोडी-थोडकी नव्हे तर चांगलीच वाढ करण्यात आली आहे. या कारच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. या स्वीडिश कार उत्पादन करणा-या (Swedish carmaker) कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. व्होल्वो कार्स इंडियाने एक्ससी 40 अशा विविध मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत 3 टक्क्यांनी वाढून 44.5 लाख रुपये, एक्ससी 60.4 टक्क्यांनी वाढून 65.9 लाख रुपये, एस 90 ची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 65.9 लाख रुपये आणि एक्ससी 900 ची किंमत 3 टक्क्यांनी वाढून 93.9 लाख रुपये केली आहे.
या ग्राहकांना मिळाला दिलासा
12 एप्रिल 2022 पर्यंत व्होल्वो डीलरशिप मध्ये कार बूक करणा-या ग्राहकांना कंपनीने दिलासा दिला आहे. त्यांनी ज्या किंमतीला कार बूक केली होती. त्यांना त्याच किंमतीत कार उपलब्ध होईल. याविषयीची हमी कंपनीने दिली आहे. तर या तारखेनंतर बुकिंग केलेल्या ग्राहकांना नवीन किंमतीनुसार पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती त्यांच्यासाठी लागू असतील.
गेल्या काही महिन्यांत जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आला आहे. त्यामुळे कच्चा मालाचा खर्च आणि विदेशी बाजारपेठेतील दोलनामयस्थितीचा विपरीत परिणाम व्होल्वो कार इंडियावर झाला आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच कारच्या किंमती वाढविण्यासंदर्भात आगाऊ सचूना दिली होती.
इलेक्ट्रिक कारकडे वाटचाल
या अभूतपूर्व खर्चवाढीमुळे कंपनीला सर्व उत्पादनांच्या ऑफरच्या एक्स शोरूमच्या किंमती वाढविण्यास भाग पाडल्याचे व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक कारची नांदी पाहता, कंपनीने ही त्यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनांचा मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळविणार आहे.
वाहन उद्योगाला महागाईची झळ
सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांना महागाईची झळ बसली आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, टोयोटा किर्लोस्कर, तसेच लक्झरी कार उत्पादक ऑडी, मर्सडिज बेंच आणि बीएमडब्ल्यू यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढविल्या आहेत. स्टील, अॅल्युमिनियम, तांबे आणि इतर धातुंच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहन उत्पादनाचा खर्च वाढला आहे, त्यामुळे वाहन उद्योगात महागाईचे वार वाहत आहेत.
संबंधित बातम्या :
Sagwan Farming : या झाडाची लागवड करून झटपट व्हा श्रीमंत, काही वर्षांतच बनणार करोडपती !