Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो.

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 11:16 AM

नवी दिल्ली: निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प (Budget 2022) हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने चर्चा करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सर्व खासदारांना केलं. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मीडियाशी संबोधित करताना सर्व खासदारांना हे आवाहन केलं आहे. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील (india) लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. आज बजेट सत्र सुरू होत आहे. मी सर्वांचं देशातील सर्व खासदारांचं या बजेट सत्रात स्वागत करतो. आजच्या वैश्विक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी

या अधिवेशनात सर्व खासदार सर्व राजकीय पक्ष मोकळ्या मनाने उत्तम चर्चा करून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यात, गती देण्यास मदत करतील, अशी आशा करतो. वारंवार निवडणुकांमुळे अधिवेशनावर त्याचा परिणाम होतो आणि चर्चांवरही परिणाम होत असतो, हे खरं आहे. पण सर्व खासदारांना विनंती आहे की, निवडणुका आपल्या जागेवर आहेत. त्या येत जात राहतील. पण सभागृहात अर्थसंकल्पातून संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा मांडला जातो. त्यासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. आपण सर्व कटिबद्धतेने हे सत्र फलदायी बनवलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात आपण आर्थिक उंची गाठण्याची संधी मिळेल, असं त्यांन सांगितलं. या अधिवेशनात मुक्त चर्चा व्हावी, मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी, चांगल्या हेतूने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा

BUDGET 2022 JOB SEEKER : विपुलच्या नोकरीच्या शोध संपेल ? काय आहेत नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.