कर्जाची परतफेड करण्याआधीच कर्जदाराचं निधन झालं तर त्या लोनचं नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

एखाद्या बँक ग्राहकाने लोन घेतल्यानंतर त्या लोनची परतफेड करण्याआधीच त्याचं निधन झालं तर? मग त्या लोनच्या परतफेडचं काय होतं? याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (Bank loan rules after death debtor who will pay loan amount).

कर्जाची परतफेड करण्याआधीच कर्जदाराचं निधन झालं तर त्या लोनचं नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 8:33 PM

मुंबई : आपल्याला जर घर घ्यायचं असेल किंवा काहीतरी मोठा उद्योग सुरु करायचा असेल तर आपल्याकडे पैसे असणं जास्त आवश्यक असतं. काही लोकांकडे पुरेसे पैसे नसतातही. पण ते बँकेकडून होम लोन किंवा पर्सनल लोन घेऊन घर विकत घेऊ शकतात किंवा त्यांचा उद्योग-व्यवसाय सुरु करु शकतात. देशभरात लाखो नागरिक बँकेकडून अशाप्रकारे लोन घेतात. मात्र, एखाद्या बँक ग्राहकाने लोन घेतल्यानंतर त्या लोनची परतफेड करण्याआधीच त्याचं निधन झालं तर? मग त्या लोनच्या परतफेडचं काय होतं? की त्या माणसापाठोपाठ लोनही संपतं? याचबाबतची सविस्तर माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत (Bank loan rules after death debtor who will pay loan amount).

‘मनी 9’ च्या रिपोर्टनुसार, प्रत्येक लोनच्या परतफेडी संदर्भात वेगवेगळे नियम असतात. हे नियम होम लोन आणि पर्सनल लोनसाठी वेगवेगळे असतात. त्यामुळे लोनच्या विविध प्रकारानानुसार लोन परतफेडीची प्रक्रिया वेगळी असते. ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण त्याचा प्रत्येकाला फायदा होऊ शकतो (Bank loan rules after death debtor who will pay loan amount).

होम लोनसाठी नेमके नियम काय?

जेव्हा होम लोन घेतलं जातं तेव्हा घराचे कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवावे लागतात. याचा अर्थ घरच गहाण ठेवलं जातं. होम लोन धारकाचं लोनच्या पैशांची पूर्ण परतफेड करण्याआधीच मृत्यू झाला तर लोन धारकाच्या वारसावर परतफेड करण्याची जबाबदारी असते. जर ते परतफेड करु शकत असतील तर त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. अन्यथा बँक त्यांची संपत्ती विकून लोनचे पैसे परत करण्याची सूचना देते.

जर लोनधारकाच्या वारसाकडून पैशांची परतफेड होऊ शकली नाही तर बँक ज्या संपत्तीवर लोन घेतलं आहे त्या संपत्तीचं निलामी करुन पैसे मिळवते.

याव्यतिरिक्त काही बँक नव्या पर्यायानुसार काम करतात. हा नवा पर्याय म्हणजे विमा. बँक लोन देताना लोनधारकाची विमा काढते. लोन धारकाचा जर मृत्यू झाला तर बँक विमा कंपन्यांकडून पैसे वसूल करते. त्यामुळे कधीही लोन घेताना तुम्ही बँकेला विम्याबाबत विचारु शकतात.

पर्सनल लोनसाठी नियम काय?

पर्सनल लोनसाठी होम लोनपेक्षा वेगळे नियम असतात. पण हे लोन बँकेसाठी जास्त सुरक्षित नसतं. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डच्या आधारावर घेतलेलं लोन हे व्यक्तीच्या निधनानंतर संपतं. कारण पर्सनल लोनवर कुणीही वारस नसतं. त्यामुळे व्यक्तीच्या निधनानंतर ते लोनही संपतं.

वाहन लोनसाठी नेमके नियम काय?

बँकांसाठी वाहनांचं लोन हे होम लोन सारखंच सुरक्षित असतं. लोनच्या रकमेची परतफेड करण्याआधी लोन धारकाचं निधन झालं तर घरातील सदस्यांना लोनची परतफेड करावी लागते. अन्यथा बँक संबंधित वाहन विकून पैसे वसूल करते.

हेही वाचा : इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.