AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BANK HOLIDAY: मे महिन्यात 11 दिवस बँका बंद, घरबसल्या बँकिंगचे जाणून घ्या पर्याय

सणवार व साप्ताहिक सुट्ट्यांचा विचार करता मे महिन्यात एकूण अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RESERV BANK OF INDIA) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (HOLIDAY CALENDER) घोषित करते. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून तीन श्रेणीत सुट्ट्यांची वर्गवारी केली जाते.

BANK HOLIDAY: मे महिन्यात 11 दिवस बँका बंद, घरबसल्या बँकिंगचे जाणून घ्या पर्याय
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 2:51 PM
Share

नवी दिल्ली : नव्या महिन्याची सुरुवातच सुट्टीने झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांचे कामकाज आज होणार नाही. महाराष्ट्रासहित देशाच्या अन्य राज्यात मे महिन्यात विविध सुट्ट्यांमुळे (BANK HOLIDAY) कामकाज बंद राहणार आहे. सणवार व साप्ताहिक सुट्ट्यांचा विचार करता मे महिन्यात एकूण अकरा दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारच्या सुट्टीचा देखील समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RESERV BANK OF INDIA) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (HOLIDAY CALENDER) घोषित करते. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून तीन श्रेणीत सुट्ट्यांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार बँक निहाय सुट्ट्यांचे स्वरुप बदलत असते. चालू महिन्यात तुमची बँकेत कामे असल्यास तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांची वेळापत्रक पाहावे लागतील. अन्यथा तुमचं नियोजन कोलमडू शकतं. आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी तुम्ही नियोजन समजावून घेणं महत्वाच आहे.

मे महिन्यातील सुट्ट्यांचं वेळापत्रक-

  1. · 1 मे – महाराष्ट्र दिन व रविवार
  2. · 3 मे- मंगळवार (ईद-उल-फितर, भगवान परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया)
  3. · 8 मे- रविवार
  4. · 9 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती (विशिष्ट राज्य)
  5. · 14 मे- दुसरा शनिवार
  6. · 15 मे- रविवार सुट्टी
  7. · 19 मे- गुरुवार (बौद्ध पौर्णिमा)
  8. · 22 मे- रविवार
  9. · 28 मे- चौथा शनिवार
  10. · 29 मे- रविवार सुट्टी

बँका बंद, कामकाज सुरू-

बँकांना सलग सुट्ट्या असल्यास सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. निवृत्तीवेतन धारकांना देखील विविध कामकाजासाठी बँकेकडे रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे संभाव्य त्रास टाळण्यासाठी डिजिटल बँकिंगचा पर्याय उपलब्ध असेल. पैसा काढणे, पैसे जमा करणे तसेच विविध देवाणघेवाणीसाठी ई-बँकिंग महत्वाची ठरते. तुम्ही विविध बँकांच्या संकेतस्थळावर जावून सविस्तर माहिती घेऊ शकतात. ज्यामुळे बँका बंद असल्या तरीही तुमचे बँकिंग कामकाज थांबणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.