एकाच वर्षात महागाई दुप्पट; दोन अंकांचे शिखर केले सर, 1953 नंतर सहाव्यांदा तर 25 वर्षांतील पहिली बेसुमार वाढ

एप्रिल 1953 पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता, त्याचे विश्लेषण केले असता, लक्षात येते की, एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दोन अंकी चलनवाढीला कारणेही वेगवेगळी होती. त्यावेळेच्या परिस्थितीने अर्थव्यवस्थेवर आघात केल्याने नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला होता.

एकाच वर्षात महागाई दुप्पट; दोन अंकांचे शिखर केले सर, 1953 नंतर सहाव्यांदा तर 25 वर्षांतील पहिली बेसुमार वाढ
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 9:16 AM

भारत जागतिक पातळीवर नवंनवे विश्व विक्रम (World Record) करत असताना, लस आणि कोरोनाविरुद्ध दमदार कामगिरी करत असतानाच भारताने महागाईतही विक्रम नोंदविला आहे. एकाच वर्षात महागाई दामदुप्पट झाली आहे. चलनवाढ दोन आकड्यांवर पोहचली आहे. भुतो न भविष्यती अशी नेत्रदीपक प्रगती देशाने महागाईत केली आहे. अर्थात ही भूषणावह गोष्ट नाही, मात्र ती घडली आहे. या वर्षी मार्चमध्ये भारताने दोन अंकी (double-digit)घाऊक किंमत चलनवाढीचे (WPI inflation) सलग 12 महिने पूर्ण केले. ही सहावी वेळ आहे जेव्हा चलनवाढीचा दर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ 10% पेक्षा जास्त राहिला आहे आणि मार्च 1994 ते मे 1995 दरम्यान असाच विक्रम भारताने केला होता. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, अस्थिर महागाईच्या काळात, तर फॉरेक्सच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 1991-92 मध्ये रुपयाच्या अवमूल्यन झाले तेव्हा नागरिकांचा घामाटा निघाला होता आणि हा काळ सरकारची परीक्षा पाहणारा होता.

एप्रिल 1953 पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता, त्याचे विश्लेषण केले असता, लक्षात येते की, एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दोन अंकी चलनवाढीला कारणेही वेगवेगळी होती. त्यावेळेच्या परिस्थितीने अर्थव्यवस्थेवर आघात केल्याने नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला होता. दुष्काळ, युद्धे ते चलन अवमूल्यन आणि जागतिक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी इतर देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्याने ( त्यावेळच्या आकेडवारीनुसार भारताची 82 टक्के लोकसंख्या आणि धान्यांचे 75 टक्के उत्पादन असे प्रमाण होते.)१९५० च्या दशकात शेतीच्या उत्पादनाची वाढ आणि वारंवार पडणा-या दुष्काळामुळे धोरणकर्त्यांना स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दशकांत भाववाढीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी फारच कमी कालावधी मिळाला.

स्वतंत्र भारतात एप्रिल 1956 ते फेब्रुवारी 1957 दरम्यानच्या 11 महिन्यांत घाऊक बाजारात दोन अंकी चलनवाढीचा पहिल्यांदा सामना करावा लागला. 2010 सालच्या भाषणात आरबीआयचे तत्कालीन कार्यकारी संचालक दीपक मोहंती यांनी या चलनवाढीचे खापर सलग दोन वर्षे दुष्काळाशी आणि कृषी उत्पादनात झालेली घट यांच्यावर फोडले होते. हा हरित क्रांतीपूर्व काळ होता,जेव्हा उत्पन्न स्थिर झाले होते आणि सरकारकडून किंमतीचे समर्थन नव्हते.

दुस-यांदा अर्थचक्र रुतले तो काळ म्हणजे ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1965 दरम्यानचे सात महिने हे होत. 1965 साली दुष्काळ तसेच पाकिस्तानशी युद्ध असा दुहेरी पेचप्रसंगातून देशाला जावे लागले. पुढे मार्च 1966 ते नोव्हेंबर 1967 दरम्यान 21 महिन्यांचा प्रदीर्घ काळ होता. मागील वर्षाप्रमाणे 1966 हेदेखील दुष्काळी वर्ष होते आणि त्यातही भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यामुळे आयातीवर अधिक खर्च करावा लागला. अधिक महाग झाली होती.

संबंधित बातम्या : 

Today petrol diesel rate : सलग विसाव्या दिवशी भाव स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Stock Market : शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा उत्पन्न, जाणून घ्या पैसे कसे मिळवाल?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.