डोळे चक्रावतील ! उद्योगपती एलन मस्क 8,32,71,48,50,000.00 रुपये एवढा कर भरणार, भारतातल्या काही राज्यांचं बजेटही एवढं नाही?

श्रीमंती ही दाखविण्यात आणि दिसण्यात सलते. मात्र श्रीमंतीला संस्कार आणि कर्तव्याची जोड मिळते तेव्हा डोळे दिपतात. गर्भश्रीमंत एलॉन मस्क याच्या ट्वीटमुळे अमेरिकेत चर्चेला तोंड फुटलंय. एरव्ही श्रीमंत लोक कर बुडवे असतात या समजला मस्कने कृतीतून उत्तर दायचं ठरवलंय. तो कर भरतोच. मात्र यंदा त्याने तुमचा विश्वास बसणार नाही इतका कर मोजायचं ठरवलंय. अर्थात हा जागतिक रेकॉर्ड असेल. त्याची ही कृती अनेक करबुडव्या श्रीमंतांसाठी आणि कर वाचविण्यासाठी मरमर करणा-या सेलिब्रिटींच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे.

डोळे चक्रावतील ! उद्योगपती एलन मस्क 8,32,71,48,50,000.00 रुपये एवढा कर भरणार, भारतातल्या काही राज्यांचं बजेटही एवढं नाही?
कर
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 11:07 AM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीचा सर्वेसर्वा एलॉन मस्कने सध्या अमेरिकेसह जगाभरातील श्रीमंतांच्या उरात धडकी भरवली आहे. पठ्याने दावाच तसा केला आहे. बरं त्यानं दावा करुन सोडून दिला नाही तर त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन जाहीर ही करुन टाकलंय, तो कर किती भरणार ते. अर्थात श्रीमंत लोक कर बुडविण्याकडे अधिक लक्ष देतात.

मस्कवर ही कर बुडवल्याच्या आरोपांची राळ उठली नी बहाद्दराने जगातील सर्वाधिक कर भरण्याचे शिवधनुष्य पेलले. जगभरातील लोकांनी गुगल, याहू आणि अनेक सर्चबाबांचे डोके खाजविले आणि खोल खोल माहितीतून हा बाबा नेमका किती श्रीमंत तो किती टॅक्स भरतो याची आकडेमोड आकडी येऊपर्यंत सुरु होती. टीवटरवरुन ते किती कर भरतात आणि भरणार आहेत याची जाहिर आकडेवारी देऊन मस्कने या गोंधळाला पूर्ण विराम दिला.

या अब्जाधीशाला यंदा एक हजार कोटी ($10 billion) कर जमा करायचा होता. Blomberg News ने या आकड्यांची खातरजमा केली होती. यंदाच्या जूनमधील एका रिपोर्टनुसार मोठ्या प्रमाणपात संपत्ती कमावविलेल्या मस्क यांनी अत्यंत कमी कर भरणा केला आहे. मात्र आपण टेस्ला अथवा स्पेसएक्समधून वेतन उचलले नाही आणि 53 टक्के कर भरल्याचा दावा मस्कने केला होता. दरम्यान अमेरिकेतली डेमोक्रॅटीक पक्षाचे सिनेटर अलिझाबेट वॉर्नर यांनी मस्क यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2021 या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर कर बुडवेगिरीची राळ उडविली.

आणि पठ्ठ्याने डोळे दिपविले

आता वेळ मस्क यांची होती. या वैयक्तिक टिकेला उत्तर देताना, त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील आपण सर्वात मोठा करदाता असू आणि यंदा सर्वाधिक कर भरणार असल्याचे ट्वीट केले. मी किती कर भरणार याविषयी लोकांकडून विचारणा होत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की मी 1100 कोटी डॉलरहून ($11 billion) अधिक रक्कमेचा कर भरणार असल्याचे ट्वीटर अकाऊंटवरुन जाहीर केले. संबंधित बातम्या : 

Unique Digital Health ID card | युनिक डिजिटल हेल्थ आयडी, आरोग्याच्या जन्मकुंडलीची स्टेप बाय स्टेप माहिती

‘या’ बँका देतात झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर अधिक व्याज, खाते उघडण्यापूर्वी यादी चेक करा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.