HDFC बँकेच्या ‘या’ सेवा दोन दिवस बंद, व्यवहारावर परिणाम? जाणून घ्या
तुमचं HDFC बँकेत खातं असेल तर ही बातमी नक्की वाचा. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. आज 14 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून ते उद्या 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजेच 14 तास ऑफर टॅबची सुविधा नेट बँकिंगवर मिळणार नाही. उद्या 15 डिसेंबर 2024 रोजी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 4 तास नवीन नेट बँकिंगवर म्युच्युअल फंड व्यवहार होणार नाहीत.
HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, तुमच्या व्यवहारात अडथळा येऊ शकतो. HDFC हा अलर्ट आज 14 आणि उद्या 15 डिसेंबरसाठी जारी केला आहे.
कोणत्या सेवांवर परिणाम?
क्रेडिट कार्ड व्यवहारांमुळे IMPS, RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग, UPI व्यवहार आणि डीमॅट व्यवहार यासारख्या नेट बँकिंग सेवा या दोन दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहू शकतात, अशी माहिती HDFC बँकेने दिली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना कोणत्या प्रकारचे अपडेट्स दिले आहेत, हे देखील आम्ही तुम्हाला सविस्तर पुढे सांगत आहोत.
आज ‘या’ सेवा बंद राहणार
HDFC बँकेच्या वेबसाईटनुसार, 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत 30 मिनिटांसाठी क्रेडिट कार्डव्यवहार बंद राहतील. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपची सेवा दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत सुमारे तीन तास बंद राहणार आहे.
डीमॅट व्यवहाराची सुविधा बंद राहणार
खात्याशी संबंधित तपशील, ठेवी, निधी हस्तांतरण (IMPS, RTGS, NEFT आणि UPI), मर्चंट पेमेंट आणि त्वरित खाते उघडण्याची प्रक्रिया यासारख्या सुविधा देखील बंद राहतील. तसेच सकाळी 5 ते सायंकाळी 7 असे दोन तास डीमॅट व्यवहाराची सुविधा राहणार नाही.
ऑफर टॅबची सुविधा नेट बँकिंगवर मिळणार नाही
आज 14 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान म्हणजेच 14 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजेच 14 तास ऑफर टॅबची सुविधा नेट बँकिंगवर मिळणार नाही. 15 डिसेंबर 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 4 तास नवीन नेट बँकिंगवर म्युच्युअल फंड व्यवहार होणार नाहीत.
HDFC ने ग्राहकांना काय सल्ला दिला?
HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांच्या बँकिंग सुविधांचे आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने, ते संभाव्य सिस्टम देखभालमुळे होणारी कोणतीही गैरसोय टाळू शकतात.
तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर खालील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही खालील माहिती देखील जाणून घ्या.
ICICI बँकेच्याही काही सुविधा बंद
ICICI बँकेने नुकतीच आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. ICICI ने ईमेलद्वारे भविष्यातील देखभालीची माहिती दिली आहे. या देखभाल कालावधीत RTGS व्यवहार तात्पुरते बंद राहतील. ICICI बँकेच्या देखभालीचे काम 14 डिसेंबर रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून सुरू होईल आणि 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत चालेल.
ICICI बँकेचे ग्राहक या कालावधीत सुरू करण्यात आलेले RTGS व्यवहार 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 06:00 नंतर पुढे ढकलले जातील आणि प्रक्रिया केली जाईल. बँक ग्राहक या कालावधीत पर्याय म्हणून आयमोबाइल किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे NFT, IMPS किंवा UPI वापरू शकतात.