AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारात तेजी

धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारामध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारात तेजी
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 4:01 PM
Share

नवी दिल्ली – धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारामध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना संकट आहे. मात्र आता झपाट्याने कमी होत असलेली रुग्ण संख्या आणि वाढत्या लसीकरामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा बाजारपेठेवर होत असल्याचे दिसून येत आहे. सोने स्वस्त झाल्याने धनत्रयोदशीचा मुहुर्त साधात अनेक जण दागिन्यांची खऱेदी करताना दिसून येत आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरानंतर सोन खरेदीचा मुहुर्त सुरू झाल्याने, खेरदीसाठी ग्राहक गर्दी करत असून बुधवारी दुपारपर्यंत ही गर्दी कायम राहाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सोन्याच्या किमतीमध्ये काही प्रमाण घट झाली आहे. दिल्लीमध्ये सोन्याचे दर हे प्रती तोळा 46 हजार रुपये इतके आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर हे तब्बल 57 हजारांवर पोहोचले होते. मात्र आता त्यामध्ये दहा हजारांची घट झाली आहे. परंतु मागील धनत्रयोदशीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरामध्ये जवळपास 17 टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

100 ते 150 टन सोन्याची विक्री

एका सर्वेक्षणानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भारतामध्ये तब्बल 100 ते 150 टन सोन्याची विक्री होते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने सोन्याच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली होती. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर केवळ 40 ते 50 टन सोन्याचीच विक्री झाली. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा एकदा विक्रीमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी सुर्वण विक्री ही 2019 च्या पातळीवर राहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

दिवाळी बोनसची ‘इथे’ करा गुंतवणूक; मिळवा अधिक फायदा

सुवर्ण कर्ज माफ करत या राज्यातील सरकारने जनतेला दिले दिवाळीचे मोठे गिफ्ट!

पॉलिसी घेताना ही चूक तर केली नाही ना? नाहीतर फुटकी कवडीही मिळणार नाही!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.