स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद

मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. या स्वप्नांच्या शहरात असणाऱ्या गगनचुंबी इमारतींमध्ये आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे अनेक माणसं ते स्वप्न पूर्ण करतातही. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे गगनचुंबी इमारतींमध्ये फ्लॅट घेण्यासाठी नागरिकांचा जो कल वाढलाय त्याबद्दल आम्ही बोलत आहोत.

स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 6:12 PM

मुंबई : मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. या स्वप्नांच्या शहरात असणाऱ्या गगनचुंबी इमारतींमध्ये आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे अनेक माणसं ते स्वप्न पूर्ण करतातही. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे गगनचुंबी इमारतींमध्ये फ्लॅट घेण्यासाठी नागरिकांचा जो कल वाढलाय त्याबद्दल आम्ही बोलत आहोत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ऑबेरॉय रिअ‍ॅलिटी या बांधकाम कंपनीने मुंबईच्या गोरेगाव येथे सुरु केलेल्या नव्या प्रोजेक्टला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. या कंपनीने नुकतंच ज्या मोठमोठ्या टॉवरचा प्रोजेक्ट आखलाय त्यापैकी अधिकाधिक फ्लॅट्सची बुकिंगदेखील झालीय. या नव्या टॉवरमधील आतापर्यंत कंपनीने एकूण 787 कोटींचे फ्लॅट विक्री केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला गती मिळताना दिसत असल्याचं चित्र आहे.

तीन दिवसात कोट्यवधींचे फ्लॅट्स विक्री

ऑबेरॉय रिअ‍ॅलिटीच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव एलिशियन प्रोजेक्ट असं नाव आहे. हे प्रोजेक्ट मुंबईच्या गोरेगाव येथील ओबेरॉय गार्डन सिटी येथे उभारलं जात आहे. खरंतर या नव्या प्रोजेक्टची घोषणा नुकतीच 28 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. त्यानुसार तिथे आता एक नवं गगनचुंबी टॉवर उभारलं जातंय. कंपनीने आतापर्यंत या प्रोजेक्टमध्ये 3.90 लाख चौरसफूट जागेची किंवा एकंदरीत फ्लॅट्सच्या जागेची विक्री केलीय. त्याची एकूण किंमत 787 कोटी इतकी आहे. ही कमी वेळातील सर्वाधिक बुकिंग आणि विक्रीची किंमत आहे. याशिवाय ओबेरॉय गार्डन सिटी येथील विविध प्रोजेक्टमधून कंपनीने 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 2705 कोटी रुपयांचे फ्लॅट्स विक्री केले आहेत.

ओबेरॉय रिअ‍ॅलिटीचे सर्वेसर्वा विकास ओबेरॉय यांची प्रतिक्रिया

ग्राहकांकडून मिळणाऱ्या उत्सफुर्त प्रतिसादावर ओबेरॉय रिअ‍ॅलिटीचे सर्वेसर्वा विकास ओबेरॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे क्षण आमच्यासाठी खरंच खूप आनंदी आणि महत्त्वाचे आहेत. ग्राहकांकडून मिळणाऱ्या उत्सफुर्त प्रतिसादाने आम्हाला समाधान वाटतंय. या प्रतिसादावरुन ग्राहकांचा चांगल्या ब्रँडवर विश्वास आहे, असं लक्षात येतंय. एलिशियन हे खरंतर आयडिएल चॉईस आहे. ज्यांना चांगली लॅविश लाईफ जगायचीय, याशिवाय मुंबई शहरासोबत कनेक्ट राहायचंय त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट एक चांगला पर्याय आहे. आम्ही ग्राहकांच्या या प्रतिसादाने प्रभावित झालोय”, असं विकास ऑबेरॉय यांनी सांगितलं.

खरंतय या नव्या टॉवरमध्ये तीन ते चार इमारती आहेत. या इमारतींमध्ये थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स आहेत. फोर बीएचके फ्लॅट्ससाठी मस्त बाल्कनी आहे जिथून आरे कॉलनीचं मनाला गार करेल असं हिरवेगार नैसर्गिक दृश्य बघायला मिळेल. ते दृश्य खरंच डोळ्यांचं पारणं फेडेल. विशेष म्हणजे या प्रजोक्टमध्ये स्क्वॉश कोर्ट, गोल्फ सिम्युलेटर, फुटसल कोर्ट, मिनी थिएटर आणि अशा बऱ्याच सुविधा आहेत.

हेही वाचा :

फक्त एकदाच सामान विकत घेऊन सुरु करा ‘हा’ व्यवसाय; आयुष्यभर कमाईची संधी

या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 483 टक्के रिटर्न्स

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.