डिटर्जंट पावडर आणि शॅम्पू महागले, P&G ने सर्व उत्पादनांच्या किमती 4-11 टक्क्यांनी वाढवल्या!

दिवाळीच्या अगोदर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. डिटर्जंट पावडरपासून ते शॅम्पूपर्यंत सर्व काही महाग झाले आहे. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थने (Procter & Gamble Hygiene and Health) आपल्या सर्व उत्पादनांच्या किमती 4 ते 11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

डिटर्जंट पावडर आणि शॅम्पू महागले, P&G ने सर्व उत्पादनांच्या किमती 4-11 टक्क्यांनी वाढवल्या!
डिटर्जंट पावडर
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:53 AM

मुंबई : दिवाळीच्या अगोदर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. डिटर्जंट पावडरपासून ते शॅम्पूपर्यंत सर्व काही महाग झाले आहे. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थने (Procter & Gamble Hygiene and Health) आपल्या सर्व उत्पादनांच्या किमती 4 ते 11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीने उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मनुसार, कंपनीने जुलैपासून एरियल आणि टाइड या डिटर्जंट पावडर ब्रँडच्या मोठ्या पॅकच्या किमती 4-5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. तर पॅन्टीन आणि हेड अँड शोल्डर्स या ब्रँडच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या कालावधीत 11 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीची दुसऱ्यांदा दरवाढ 

P&G ने जागतिक स्तरावर समान किंमती वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात कंपनीने जाहीर केले की ते जास्त मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमतीमुळे सौंदर्य आणि स्किनकेअर उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. कंपनीने देशातील ही दुसरी दरवाढ केली आहे. याआधीही कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स (GCPL), मॅरिको आणि डाबर इंडिया यासारख्या अनेक FMCG कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. जेणेकरून जास्त किंमतीमुळे त्यांचे मार्जिन कमी होईल. डाबरने FY2021 च्या शेवटच्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवल्या होत्या आणि जर खर्च कमी झाला नाही तर येत्या तिमाहीत किमतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्स सारख्या पेंट कंपन्यांनी किमती 9-11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

मोठ्या पाकिटांच्या किमती वाढल्या

P&G ने 1 किलो आणि त्याहून अधिक वजनाच्या मोठ्या पॅकेट्सच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून सामान्य माणूस आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांद्वारे वापरल्या जाणार्‍या छोट्या पॅकेट्सवर भार पडू नये. एरियल आणि टाइडसारख्या डिटर्जंट पावडरच्या छोट्या पॅकेट्सच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. लहान आणि मध्यम पॅकेट्सच्या विक्रीत जुलैमध्ये 4-5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या : 

घर बसल्या दरमहा 60 हजार कमावण्याची संधी; असा करा स्वतःचा व्यवसाय

IT Refund: आयकर विभागाने करदात्यांना आतापर्यंत 1.02 कोटी पाठवले, तुम्हाला मिळाले का?

7th Pay commission: महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपूर्वीच मिळणार, पगाराचे गणित समजून घ्या

(P&G increased the prices of all products by 4-11 per cent)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.