Shark Tank India: कोण आहेत मालू सिस्टर्स, ज्यांनी पुरुषांच्या ‘हायजिन प्रोडक्ट’वर डील मिळवली ?

अहमदाबादमधील दोन चुलत बहिणींनी घरातील व समाजाचा विरोध झुगारुन मनाच एकलं. परिणामस्वरुप शार्क टँक इंडियावर 20 टक्के इक्विटीसाठी तब्बल 25 लाखांची गुंतवणूक त्यांनी मिळवली आहे.

Shark Tank India: कोण आहेत मालू सिस्टर्स, ज्यांनी पुरुषांच्या 'हायजिन प्रोडक्ट'वर डील मिळवली ?
अहमदाबादमधील दोन चुलत बहिणींची खास कामगिरी
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:50 AM

‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण आपण अगदी घासूनपूसून एकली आहे. परंतु फारच कमी लोक असे आहेत, जे आपल्या मनाचं एकतात. लोक काय म्हणतील या भावनेतून अनेकदा आपली एखादी कृती करण्याची इच्छा असूनही मनाविरुध्द करावे लागत असते. मग तो एखादा व्यवसाय (Business) करण्याचा निर्णय असो की तत्सम काहीही… समाजाचा विचार करुनच काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु याला अपवाद ठरल्याय त्या अहमदाबादेतील (Ahmedabad) दोन चुलत बहिणी… अगदी केवळ पंधरा दिवसांच्या फरकानं जन्माला आलेल्या या बहिणींमध्ये मित्रत्वाचे (Friendship) नाते आहे.

नुकतेच या दोन बहिणींनी शार्क टँक इंडियाच्या गुंतवणूकदारांना केवळ त्यांच्या ब्रँडच्या संकल्पनेनेच नव्हे तर त्यांच्या लढाऊ वृत्ती व आत्मविश्वासानेही प्रभावीत केले आहे. या मालू बहिणींनी पुरुषांच्या अंतर्गत स्वच्छते उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यातून त्यांना बराच विरोध झाला. परंतु त्यांनी हार मानली नाही. परिणाम स्वरुप त्यांच्या ब्रँडच्या संकल्पनेला ‘शार्क इंडिया’ची पसंती मिळाली. त्यांनी शार्क टँक इंडियासोबत 20 टक्के इक्विटीसाठी तब्बल 25 लाखांची गुंतवणूक मिळवली आहे.

वडीलांनी दिला पाठिंबा

मालू बहिणींनी ज्या वेळी पुरुषांच्या अंतर्गत स्वच्छतेचे पोडक्ट विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी त्यांना वडील सोडले तर इतरांकडून भरपूर विरोध झाला. त्यांची आईदेखील त्यांच्या या व्यवसायाच्या विरोधात असल्याचे ते सांगतात. अशा व्यवसायाला घर व समाजातून विरोध होणे साहजिक होते. परंतु त्या वेळी त्यांना त्यांच्या वडीलांकडून खंबीर पाठिंबा मिळाला. यामुळेच त्या या व्यवसायात यशस्वी होउ शकल्या.

इथे पाहा इंस्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Ananya Maloo (@ananya.maloo)

पोस्ट लिहून जिंकली मने..

अनन्या मालूने यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करीत आपल्याला किती संघर्ष करावा लागला याची माहिती शेअर केली आहे. ती म्हणते, ‘आमचा इथपर्यंत येण्याचा प्रवास अतिशय खडतर होता. यासाठी अनेक चढउतार बघावे लागले, आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा घरातील तसे मित्रमंडळींमध्येही कोणीही आमच्या बाजूने नव्हते. सर्व जण आमच्या क्षमतेवर अविश्‍वास दाखवत होते. परंतु आम्ही त्यांची पर्वा केली नाही. आम्ही आमचा संघर्ष पुढेही सुरु ठेवला. स्वतला सिध्द करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. हे केवळ व केवळ आमच्या वडीलांमुळे शक्य झाले आहे. त्यांचे प्रेम व विश्‍वास आम्हाला प्रचंड उर्जा देत असतात’.

संबंधित बातम्या : 

आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका! महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.