Suicide | वसईत 20 वर्षीय तरुणाने टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू…
आज सकाळी एका 20 वर्षाच्या तरूणाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केलीयं. हा तरूण क्लासला जाण्यासाठी निघाला होता. मात्र घरातून बाहेर पडल्यावर तो बाहेर न जाता टेरेसवर गेला आणि टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.
वसई : वसई (Vasai) येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. वसईत 20 वर्षीय तरुणाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केलीयं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंद के प्रसाद असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आयटीचा विद्यार्थी होता. वसई पश्चिमेच्या वसंत नगरी परिसरातील सेक्टर 2 मध्ये ही घटना घडलीयं. आज सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली आहे. या 20 वर्षींय तरूणाने नेमकी कशामुळे आत्महत्या केली, याचा शोध आता पोलिसांकडून (Police) सुरूयं.
20 वर्षाच्या तरूणाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत केली आत्महत्या
आज सकाळी 20 वर्षाच्या तरूणाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केलीयं. हा तरूण क्लासला जाण्यासाठी निघाला होता. मात्र घरातून बाहेर पडल्यावर तो बाहेर न जाता टेरेसवर गेला आणि टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. हा तरूण आयटीचा विद्यार्थी असल्याची देखील माहिती मिळते आहे. वसंत नगरी परिसरातील सेक्टर 2 ही घटना घडलीयं.
माणिकपूर पोलिसांनी तपास केला सुरू
तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाहीयं. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केलायं. आता पोलिस तरूणाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध घेत आहेत.