Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली

जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत.

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 8:38 PM

जालना : पुण्यात बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात देखील तशीच एक घटना समोर आली आहे. जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. संबंधित घटना ही आज (28 ऑक्टोबर) दुपारी घडली. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आरोपी तोंडाला रुमाल बांधून बँकेत शिरले

पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. त्यामुळे कर्मचारी घाबरले. आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले. त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली. काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न?

गेल्या आठवड्यात पुण्यात चार ते पाच चोरांनी महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही बँकेमध्ये सुरक्षा वाढवली जाताना दिसत नाहीय. याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आलाय म्हणजे चोरांचा हा दरोड्याचा नवा पॅटर्न आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

घटनेचा थरार बघा :

पुण्यात नेमकं काय घडलं होतं?

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं होतं.

हेही वाचा :

मुलाचा वियोग, पत्नी-सासूचा जाच, रडत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड, 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.