Kolhapur | हालेवाडीतील मंदिरातून 14 तोळे सोन्यावर डल्ला, पकडले जाऊ नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराही पळवला
आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात लक्ष्मी मंदिरातील चोरी झाल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. कारण हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनही चोरीची घटना घडलीयं. चोरट्यांनी मूर्तीवरील 14 तोळे दागिने चोरले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून या मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur) आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. चोरांनी चक्क मंदिरातील 14 तोळे सोन्यावर (Gold) डल्ला मारलायं. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालयं. विशेष म्हणजे हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनही चोरट्यांनी इतकी मोठी चोरी केल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय. आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात चोरट्यांनी लक्ष्मी मंदिरातील मूर्तीवरचे दागिने चोरून नेले. चोरी (Theft) करून चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील पळवून नेलीयं.
गावात लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याने एकच खळबळ
आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात लक्ष्मी मंदिरातील चोरी झाल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. कारण हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनही चोरीची घटना घडलीयं. चोरट्यांनी मूर्तीवरील 14 तोळे दागिने चोरले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून या मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी दागिन्यांसोबतच मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील नेलीयं. मात्र, मंदिरातील चोरीच्या प्रकारामुळे आजरा परिसरात खळबळ उडालीयं.
चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे…
चोरांनी चोरी करत तब्बल 14 तोळे सोने पळवले. मात्र, सोबत मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील नेलीयं. यामुळे या चोऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. मात्र, चोर आसपासचे असल्याची शक्यता वर्तवली जातंय. कारण चोरी पकडली जाऊ नये, याकरिता संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणाच चोरटे घेऊन गेले आहेत. आता या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलायं.