‘पोलिसांनी मला सोडण्यासाठी 10 हजार घेतले, मारहाण करणारी तरुणी पोलिसांची खबरी’, कॅब ड्रायव्हरचा गंभीर आरोप
सोशल मीडियावर लखनऊचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी कॅब चालकाला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे.
लखनऊ : सोशल मीडियावर लखनऊचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी कॅब चालकाला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी सुरुवातीला कॅब चालकाला दोषी ठरवलं जात होतं. मात्र या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सत्य समोर आलं. सोशल मीडियावर कारवाईची मागणी वाढल्यानंततर अखेर पोलिसांनी याप्रकरणी तरुणीविरोधात लूट आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॅब चालकाने देखील आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मारहाण करणारी तरुणी ही पोलिसांची खबरी आहे. त्यामुळे तिच्याविरोधात कारवाई न करता आपल्याला लॉकअपमध्ये बंद करण्यात आलं, असा दावा कॅब ड्रायव्हर सादत अली सिद्दीकी याने केला आहे. विशेष म्हणजे तरुणी ही पोलिसांची खबरी असल्याची माहिती स्वत: कृष्णानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना आपल्याला सांगितल्याची माहिती कॅब चालकाने आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
कॅब ड्रायव्हरने एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलंय? जसंचं तसं
मी 30 जुलैच्या रात्री शेवटची ट्रीप पूर्ण करुन घरी निघालो होतो. यादरम्यान एका चौकावर सिग्नलमुळे गाडी थांबवावी लागली. याचवेळी एक तरुणी माझ्या गाडीजवळ आली. तिने गाडीच्या खिडकीमधून हात टाकला आणि माझा गळा पकडला. तिने मला खेचलं आणि कारमधून बाहेर काढलं. तिने कारमध्ये ठेवलेले माझे 600 रुपये घेतले. तसेच मोबाईल रस्त्यावर आपटून फोडून टाकला. माझा नेमका गुन्हा काय असं मी विचारत होतो आणि मला सलग 10 मिनिटे मारहाण करत राहिली.
अखेर संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पण पोलिसांनी तरुणीचीच बाजू घेतली. पोलीस मला गाडीसह पोलीस स्टेशनला घेऊन गेली. त्यानंतर त्यांनी मला लॉकअपमध्ये कैद केलं. रात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये माझे दोन भाऊ आले. त्यांनी पोलिसांना मला अटक का केलं? याचा जाब विचारला तर त्यांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आमच्या तिघांवर शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल केला.
मला मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव प्रियदर्शीनी नारायण ऊर्फ लक्ष्मी असं आहे. ती पोलिसांची खबरी आहे. कृष्णा नगर पोलिसांनी स्वत: आम्हाला ही माहिती दिली आहे. ती पोलिसांची खबरी असल्या कारनाने तिच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
पोलिसांनी मला अटक केल्यानंतर दुसऱ्यादिवशी माझ्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर मला आणि माझ्या गाडीला सोडलं. त्यामुळे या खबरी महिलेवर दुसऱ्या पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात यावी. तसं केल्यावरच मला न्याय मिळेल.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
All those who are saying “Bina baat toh nai maara hoga” look at this #ArrestLucknowGirl @Uppolice @adgzonelucknow pic.twitter.com/JGB8gOeLq0
— Saif Rangrez (@mr_saif_17) August 2, 2021
हेही वाचा :
कुर्ला स्टेशनच्या स्कायवॉकवर दोन गर्दुल्ले भिडले, अंमली पदार्थावरुन एकमेकांवर जीवघेणा हल्ला