लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !

उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने पैसे देवून एका तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. पण ते लग्न फार कार टिकलं नाही. लग्नानंतर लगेच त्याची भामटी पत्नी बॅगेतील इतर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली.

लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:53 PM

लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. पती-पत्नी हे नातं दोघांच्या विश्वासाने तयार होतं. याशिवाय नातं हे पैशांनी निर्माण होत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि माणुसकी दोन्ही खर्च करावे लागतात. पण उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने पैसे देवून एका तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. पण ते लग्न फार कार टिकलं नाही. लग्नानंतर लगेच त्याची भामटी पत्नी बॅगेतील इतर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. त्यामुळे नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबियांकडे आता पश्चात्तापाशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लग्नासाठी नवरीची अट

संबंधित घटना ही मैनपुरी बेवर पोलीस ठाणे हद्दीतील परौंखा गावात घडली. पीडित पतीचं राजू असं नाव आहे. राजूचं लग्न एका मध्यस्थीच्या हस्ते जमलं होतं. या मध्यस्तीने राजूच्या वडिलांपुढे लग्नासाठी एक अट ठेवली होती. मुलाचं लग्न करायचं असेल तर नवरीला 80 हजार रुपये द्यावे लागतील, असं मध्यस्थीने सांगितलं होतं. राजूचे वडील त्याच्यासाठी अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होते. पण लग्नासाठी योग्य मुलगी मिळत नसल्याने त्यांनी अखेर मध्यस्थीच्या अटीला होकार दिला. नवरीला 80 हजार देवून आपल्या मुलांचा संसार सुरु होईल, अशी त्यांना आशा होती. पण भलतंच काहितरी वेगळं घडलं.

नवरदेवाच्या वडिलांनी नवरीला 80 हजार दिले

राजूच्या वडिलांनी नवरीला 80 हजार रुपये दिले. त्यानंतर 17 ऑगस्टला राजूचं संबंधित मुलीसोबत लग्न लागलं. विशेष म्हणजे नवरदेवाच्या कुटुंबियांनी नवरीला कपडे, दागिने आणि अनेक उपहार दिले. लग्नानंतर राजू पत्नीला घेऊन आपल्या घरी परौंखा गावाच्या दिशेला निघाला. यादरम्यान बस स्टँडवर नवरीने राजूकडून पिण्याच्या पाण्याची बाटली आणायला सांगितली. नवरदेव राजू पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात गेला तेवढ्या नवरी सर्व पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. राजूने आपल्या नवरीला शोधलं पण तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता.

पीडित नवरदेवाची पोलिसात तक्रार

अखेर आपण लुबाडलो गेलो याची जाणीव राजू आणि त्याचे पिता राजेंद्र यांना झाली. त्यांनी पोलीस ठाण्यात जावून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याची सर्व बाजू ऐकून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

नंदुरबारमध्येही एका नवरीनं 13 मुलांना फसवलं, अखेर पोलिसांकडून बेड्या

काही महिन्यांपूर्वी नंदुरबारमध्येही असाच काहिसा प्रकार समोर आला होता. आरोपी सोनू नावाच्या मुलीने तब्बल 13 मुलांना फसवलं होतं. तिने तेराही जणांशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना चिक्कार लुटलं. नंतर पळून गेली. विशेष म्हणजे ती एकटी नाही तर तिच्यापाठीमागे एक मोठी टोळीच असल्याचं समोर आलं होतं. या टोळीचं नावच सोनू असं होतं. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. मे महिन्यात तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं होतं.

हेही वाचा :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.