13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?

उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात शुक्रवारी (24 सप्टेंबर) एका 13 वर्षीय मुलीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 3:38 PM

लखनऊ : मुलांसाठी आई-वडील हेच देव असतात. आई-वडील आपल्या पाल्याला लहानाचं मोठं करतात. त्याला शिक्षण देवून चांगल्या पदापर्यंत पोहोचवतात. मुलांना चांगले संस्कार लावतात. त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि कष्ट करतात. पण काही आई-वडील या गोष्टींना अपवाद ठरतात. ते आपल्या मुलांचं पालनपोषण करण्याऐवजी त्यांच्याशी विकृतपणे वागतात. वेळप्रसंगी ते त्यांची हत्या देखील करायला मागेपुढे बघत नाही. अशीच काहिशी घटना उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात शुक्रवारी (24 सप्टेंबर) एका 13 वर्षीय मुलीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतक मुलीच्या वडिलानेच मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या वडिलाने आपले प्रेमसंबंध आणि इतर गोष्टी लपविण्यासाठी तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपी वडील पोलिसांना या हत्येमागे दुसरीच भाकडकथा सांगत होता. पण पोलिसांनी योग्यप्रकारे तपास करत हत्येचा उलगडा केला.

आरोपीने पोलिसांना खोटी माहिती सांगितली

आरोपी वडिलाचं बल्लू प्रजापती असं नाव आहे. आरोपी पिता शुक्रवारी मुलीसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. कपडे धुतल्यानंतर दोघे घरी परतत असताना आरोपीने आपल्या पोटच्या मुलीची कुऱ्हाडीने हत्या केली. पण हत्येनंतर त्याने रडण्याचं नाटक केलं. शेजारच्या गावातील लोकांनी आपल्या मुलीची हत्या केली, असा आरोप त्याने केला. संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी आरोपी वडिलाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने शेजारच्या गावातील नागरिकांवर गंभीर आरोप केले. शेजारच्या गावाच्या लोकांनी माझ्या मुलीची हत्या केली, असं तो रडत-रडत पोलिसांना सांगत होता.

अखेर आरोपीचं विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड, पोलिसांकडून बेड्या

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यासाठी पोलीस गावातील अनेक गावकऱ्यांना भेटले. यादरम्यान, पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण माहिती लागली. मृतक मुलीच्या वडिलांचं विवाहबाह्य संबंध आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ज्या लोकांना याबाबत माहिती होती त्या लोकांवर आरोपी वडिलाने मुलीच्या हत्येचा आरोप केला. पण पोलिसांनी केलेल्या तपासात मुलीच्या वडीलाच्या बाजूने अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या.

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या

दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने 18 वर्षीय मुलीची भरदिवसा भर चौकात गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे मुलीची हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा :

24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, यूट्यूब व्हिडीओ बघून घरीच गर्भपात करण्याची बळजबरी, नागपुरात प्रियकराला अटक

VIDEO : चाकूचा धाक दाखवला, बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली, नागपुरात भयानक थरार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.