जंगलात 11 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे, हत्येचं गूढ उकललं, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे 11 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मृतदेहाचे 11 तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे.

जंगलात 11 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे, हत्येचं गूढ उकललं, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 11:29 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे 11 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मृतदेहाचे 11 तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. अल्पवयीन मुलाची हत्या करुन जंगलात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. जंगलात कुत्रे आणि इतर प्राण्यांनी या मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या हत्येमागील गूढ उकलण्यात यश आलं आहे.

मित्राकडूनच मित्राची हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात मृतक 11 वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच 13 वर्षीय मित्राने केल्याचं उघड झालं आहे. अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या हत्येचं गूढ उकलणं अवघड झालं होतं. या हत्येचा तपास करत असताना मृतकाच्या मित्रांशी बोलून काही माहिती मिळते का? अशा प्रयत्नात पोलीस होते. पण पोलिसांनी जेव्हा मृतकाच्या 13 वर्षीय मित्राशी बातचित केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीने पोलिसांना काय सांगितलं?

“मृतक मुलासोबत माझी गेल्या चार-पाच महिन्यांसोबतची ओळख होती. जन्माष्टीमीच्या चार-पाच दिवसांआधी मला घरच्यांनी काही सामान आणण्यासाठी 60 रुपये दिले होते. पण ते पैसे मी मृतक आणि इतर मित्रांसोबत पत्ते खेळून गमावले. घरच्यांना घाबरुन मृतक मुलाकडून 60 रुपये उधार घेतले. तेच पैसे तो जन्माष्टमीच्या दिवशी मागू लागला. पण त्यावेळी माझ्याजवळ पैसे नव्हते. मी त्याला पैसे नाहीत. नंतर देतो सांगितलं. पण तो ऐकत नव्हता”, असं आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं.

“त्यानंतर मृतक मुलगा मला शिवीगाळ करु लागला. त्यामुळे मी त्याला जंगलच्या दिशेला घेईन गेलो. यावेळी तो माझ्यासोबत भिडायला लागला. मारहाण करु लागला. मग मी देखील पायाने मारुन खाली पाडलं. यानंतर त्याने मोठा दगड मारण्याचा प्रयत्न केला. पण मी तो दगड त्याच्या हातातून हिसकावून त्याच्याच डोक्यात टाकला. त्यामुळे तो जमिनीवर खाली पडला. तो जखमी झाला. त्यानंतर मी त्याला जंगलात झाडाझुडपांमध्ये फेकून दिलं. त्यावेळी तो जिवंत होता. श्वास घेताना दिसत होता. मी तिथे असलेल्या नाल्यात रक्ताने भरलेले हात आणि कपडे धुतले आणि घरी निघून गेलो”, अशा शब्दात आरोपी मुलाने कबुली जबाब दिला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्याची आणखी चौकशी करणार आहेत. आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारणा गृहात केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पण संबंधित घटना उघड झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अल्पवयीन मुलगा इतका क्रूर कसा वागू शकतो? असा सवाल अनेकांना पडतोय.

हेही वाचा :

तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या, पत्नी रुपालीचे खळबळजनक आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, पुणे ग्रामीण हादरलं

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.