AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीबीआयच्या रडारवर आता देशमुखांची दोन्ही मुलं? कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी होतेय?

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे (After Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh his two son Salil Deshmukh and Rushikesh Deshmukh on CBI Radar).

सीबीआयच्या रडारवर आता देशमुखांची दोन्ही मुलं? कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी होतेय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 9:03 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय याप्रकरणी ईडीची देखील चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील सर्व घडामोडी आता वेगाने घडताना दिसत आहेत. या घडामोडी सुरु असतानाच आता देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ करणारी बातमी समोर आली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे (After Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh his two son Salil Deshmukh and Rushikesh Deshmukh on CBI Radar).

अनिल देशमुख यांच्या मुलांच्या कंपनीतून कोट्यवधींची देवाणघेणाव झाल्याचा संशय

सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी गुंतवणूक केलेल्या एका कंपनीच नाव समोर आलं आहे. या कंपनीचं नाव झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. दोघं भावंडांनी मार्च 2019 मध्ये झोडियाक डेलकॉम ही कंपनी आणि तिच्या उपकंपन्या विकत घेतल्या. यामध्ये जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, काँक्रीट रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिसा प्रायव्हेट लिमिटेड आणि काँक्रीट इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चारही उपकंपन्या अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या नावावर आहेत. या झोडियाक कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय सीबीआयला आहे.

अनिल देशमुख प्रकरणात दिवसभरात नेमकं काय-काय घडलं?

ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर काल दुपारी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहीले नाहीत. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली. अनिल देशमुख हे चौकशीला हजर न झाल्याने आता ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांना दुसरं समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत. येत्या एक-दोन दिवसात हे समन्स पाठवलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे

काल दिवसभरात काय-काय घडलं?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला आहे. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीची सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अशी ही कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवनांचं एक पथकही घटनास्थळी दाखल होते.

देशमुखांची आधी सीबीआयकडून चौकशी

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी, अनिल देशमुखांवर ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप, दिवसभरात काय-काय घडलं?

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.