‘तुझ्या एन्काउंटरची ऑर्डर आलीय, 12 लाख दे, नाहीतर उडवून देऊ’, गांजा व्यापाऱ्याला पोलीस नाईकाची धमकी

एन्काउंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे.

'तुझ्या एन्काउंटरची ऑर्डर आलीय, 12 लाख दे, नाहीतर उडवून देऊ', गांजा व्यापाऱ्याला पोलीस नाईकाची धमकी
गांजा व्यापाऱ्याला पोलीस नाईकाची धमकी
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 10:39 PM

ठाणे : एन्काउंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलीस नाईकासह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण 7 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी दोन आरोपी हे फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपींनी 12 लाखांची खंडणी मागितली

परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील गांजा विकणारा व्यापारी समीर सकपाळ (वय 35) या इसमाचे 14 ऑगस्टला अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी सकपाळला अज्ञातस्थळी नेले. तिथे आरोपींनी सकपाळला धमकी दिली.

“आम्ही पोलीस आहोत. तुझ्या एन्काउंटरची वरुन ऑर्डर निघाली आहे. तुला चकमकीत ठार मारायचं आहे. त्यामुळे वाचायचं असेल तर 12 लाख रुपये दे”, अशा शब्दात आरोपींनी खंडणी मागितली.

सात जणांना बेड्या

यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सकपाळ याच्याकडील 50 हजार रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे लॉकेट असा ऐवज काढून घेतला होता. नवघर पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन 7 जणांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

चोरट्याने तब्बल 20 तिजोऱ्या फोडल्या, इचलकरंजीत गोविंदराव कॉलेजमध्ये 4 लाखांची चोरी, सीसीटीव्हीत चोर कैद

‘हॅलो ! बजाज फायनान्समधून बोलतेय, कमी व्याजात जास्त पैसे देते’, शेकडोंना लुबाडणारी पूजा नागपूर पोलिसांकडून जेरबंद

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.