तिच्या टार्गेटवर ‘त्या’ मॉडेलच असायच्या… हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा रेटही ठरलेला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

मुंबईत आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली आहे. ही अभिनेत्री ग्राहकांना मॉडेल्स पुरवण्याचं काम करायची.

तिच्या टार्गेटवर 'त्या' मॉडेलच असायच्या... हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा रेटही ठरलेला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक
Suman KumariImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 9:26 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आरती मित्तल हिला हायफाय सेक्स रॅकेटप्रकरणी अटक केलेली असतानाच पोलिसांनी आता दुसऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हायफाय सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. ही अभिनेत्री ग्राहकांना मॉडेल्स पुरवायची. ज्या मॉडेल्स मुंबईत सिनेमात करिअर करायला यायच्या त्यांनाच ती टार्गेट करायची. त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भोजपुरी अभिनेत्रीसोबत दलालांनाही अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

सुमन कुमारी असं या भोजपुरी अभिनेत्रईचं नाव आहे. ती दलाल म्हणून काम करत होती. मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्रँचने ही कारवाई केली आहे. अरे कॉलनीतील रॉयल पाम हॉटेलात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या सुमन कुमारीकडे एक बनावट ग्राहक पाठवला. सुमनने त्याच्याशी डील केली. एका मॉडेलसाठी 50 हजार ते 80 हजार रुपये मागितले. त्यानंतर तिने या ग्राहकाला आरे कॉलनी येथील रॉयल पाम हॉटेलात पाठवलं. या ठिकाणी काही मॉडेल्स आधीच होत्या. यावेळी पोलिसांनी पैसे घेतानाच सुमन कुमारीला रंगेहाथ पकडलं. तसेच हॉटेलातून तीन मॉडेल्सची सुटकाही केली.

त्या मॉडेल्सला हेरायची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमन कुमारी ही स्वत: मॉडेल आणि भोजपुरी अभिनेत्री आहे. ती ग्राहकांना मॉडेल्स सप्लाय करायची. ज्या मॉडेल्स मुंबईत सिनेमात करिअर करण्यासाठी आल्यावर आर्थिक तंगीतून जात होत्या, अशा मॉडेल्सला ती हेरायची. या मॉडेल्सला पैशांची गरज असायची. तसेच आपली लाइफस्टाईलही मेंटेन ठेवायची असायची. त्यांना मोठ्या पैशाचं अमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलायची.

भोजपुरी सिनेमात काम

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये दलाली करणारी सुमन कुमारीने भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. लैला मजनू, बाप नंबरी बेटा दस नंबरी आदी भोजपुरी सिनेमात तिने काम केलं आहे. बूम ओटिटी चॅनलवरही तिने काम केलं आहे. सुमन कुमारी चांगली गायिकाही आहे. तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरी भाषेत गाणी गायली आहेत.

सहा वर्षापासून मुंबईत

सुमन कुमारी गेल्या सहा वर्षापासून मुंबईत राहते. मात्र ती सेक्स रॅकेटमध्ये कधी आली याची माहिती मिळू शकलेली नाही. याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस तिच्या सोबतच्या आणखी एका दलालाचा शोध घेत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.