नगरसेवक म्हणून निवडून आले, नंतर अपात्र ठरले, पण पगार घेतला, अपात्र नगरसेवक 40 लाख गिळून बसले? माहिती अधिकारात उघड

कोणतीही निवडणूक असते तेव्हा काही वॉर्ड हे विशिष्ट जातीच्या उमेदरावारांसाठी राखीव असतात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील तसं असतं. पण काही उमेदवार बोगस कागदपत्रे मिळवत आपण त्याच जातीचं असल्याचं सांगत उमेदवारी लढवतात.

नगरसेवक म्हणून निवडून आले, नंतर अपात्र ठरले, पण पगार घेतला, अपात्र नगरसेवक 40 लाख गिळून बसले? माहिती अधिकारात उघड
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 3:37 PM

मुंबई : कोणतीही निवडणूक असते तेव्हा काही वॉर्ड हे विशिष्ट जातीच्या उमेदरावारांसाठी राखीव असतात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील तसं असतं. पण काही उमेदवार बोगस कागदपत्रे मिळवत आपण त्याच जातीचं असल्याचं सांगत उमेदवारी लढवतात. पण अशा नगरसेवकांचं पितळ नंतर पडतातळणीत उघड पडतं. याशिवाय अनेक कारणास्तव हे नगरसेवक अपात्र ठरु शकतात. संबंधित व्यक्ती अपात्र ठरल्याने त्याला देण्यात आलेला पगार, भत्ता हे महापालिकेने परत घेणे अपेक्षित असते. मात्र, मुंबई महापालिकेने अशा 12 अपात्र नगरसेवकांकडून जवळपास 40 लाख रुपये वसूल केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

12 नगरसेवकांनी पैसे दिलेच नाहीत

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस खात्यास पत्रव्यवहार करुन याबाबतची माहिती मागवली होती. नगरसेवक पद अपात्र ठरल्यानंतर 12 नगरसेवकांकडून वेतन आणि भत्ता पायी अदा केलेले पैसे वसूल केले का? किंवा त्यांना किती रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती गलगली यांनी मागवली होती. त्यानंतर महापालिकेच्या चिटणीस खात्याने त्याला उत्तर देत अपात्र 12 नगरसेवकांना 39 लाख 95 हजार 833 रुपये दिल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये भाजपचे 3, शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि अपक्ष 2 नगरसेवक आहेत.

24 पैकी 12 नगरसेवकांनी पैसे दिले

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की ज्या नगरसेवकांचे पद निर्रह (अपात्र) झाले त्यांच्याकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे का? चिटणीस खात्याने माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या माहितीत 24 नगरसेवकांची यादी दिली ज्यांचे पद विविध कारणांसाठी निर्रह झाले आहेत. यात 12 नगरसेवकांनी 39 लाख 95 हजार 833 रुपये परत केलेले नाहीत. तर 9 नगरसेवकांनी तत्काळ रक्कम अदा केली आहे. 3 असे नगरसेवक आहेत जे ज्यांस निर्रह ठरल्यानंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही.

भाजप, शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी 3 नगरसेवक

थकबाकी न देण्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येक 3 नगरसेवक आघाडीवर आहेत यात भाजपाचे मुरजी पटेल 5.64 लाख रुपये, केशरबेन पटेल 5.64 लाख रुपये आणि भावना जोबनपुत्रा 3.49 लाख रुपये अदा करत नाहीत. काँग्रेसचे राजपती यादव 5.64 लाख रुपये, किणी मॉरेश 4.84 लाख रुपये आणि भारती धोंगडे 1.81 लाख रुपये अदा करण्यास तयार नाही. शिवसेनेचे सगुण नाईक 3.55 लाख रुपये, अनुषा कोडम 37 हजार आणि सुनील चव्हाण 93 हजार रुपये अदा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजीया सोफी 7.21 लाख रुपये अदा करत नाहीत. अपक्ष असलेलं चंगेझ मुलतानी 79 हजार रुपये आणि अंजुम असलम 45 हजार रुपये अदा करत नाहीत.

अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे की जे नगरसेवक रक्कम अदा करत नाहीत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पैसे वसूल होतील.

हेही वाचा :

सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक

जमीन मालकीच्या वादातून जुन्या-नवीन मालकांमध्ये हाणामारी, सीसीटीव्हीवरही दगडफेक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.