रेल्वे स्टेशनवर हत्या करुन ‘तो’ गर्दीत मिसळला, पोलिसांनी दहा दिवसात मुसक्या आवळल्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

कचरा उचलण्याच्या आणि पैशाच्या वादातून दिवसाढवळ्या कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय.

रेल्वे स्टेशनवर हत्या करुन 'तो' गर्दीत मिसळला, पोलिसांनी दहा दिवसात मुसक्या आवळल्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
रेल्वे स्टेशनवर हत्या करुन 'तो' गर्दीत मिसळला, पोलिसांनी दहा दिवसात मुसक्या आवळल्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:01 PM

कल्याण (ठाणे) : कचरा उचलण्याच्या आणि पैशाच्या वादातून दिवसाढवळ्या कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी अखेर अशोक लोदी नावाच्या आरोपीला रेल्वे क्राईम ब्राँचच्या पथकाने मशीद बंदर येथून अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपीच्या शोधत होती.

नेमकं काय घडलं?

कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर 3 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तीन तरुण आपसात भांडत होते. या भांडणा दरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला करुन त्याचा खून केला. नंतर तो फरार झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या फलाटावर अचानक लोकल गाडी आली. लोकलमधून प्रवासी उतरले. हा आरोपी त्या गर्दीत सामील झाला. सीसीटीव्हीत स्पष्ट होत नव्हते की, नक्की हा आरोपी कोणत्या दिशेने पसार झाला आहे.

पोलिसांनी आरोपींचा तपास कसा केला?

कल्याण जीआरपीने हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेत होते. रेल्वे पोलिसांकडे तीनही आरोपींचे नाव, पत्ता नव्हता. केवळ सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु होता. कल्याण क्राईम ब्रांचने तपासादरम्यान तीन पैकी एक तरुण शंकर राठोड याला ताब्यात घेतले. मात्र त्याला मयत आणि आरोपी यांची नावे माहित नव्हते. हा देखील आश्चर्याचा विशय होता. अखेर 9 दिवसांनंतर रेल्वे क्राईम ब्रांचला या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले.

अखेर मुख्य आरोपीला बेड्या

या बाबत रेल्वे क्राईम ब्रांचचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक गजेंद्र पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. या आरोपीच्या शोधात क्राईम ब्रांच पोलिसांची पाच पथके तपास करीत होती. अखेर आरोपीला मशीद बंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव अशोक लोदी आहे. तो मूळचा भोपाळचा राहणारा आहे. तीन महिन्यापूर्वीच तो मुंबईला आला होता.

आरोपीने हत्या का केली?

मयत नारायण मरावी आणि अशोक लोदीमध्ये कचरा उचलण्यावरुन आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरुन वाद झाल्याने संबंधित प्रकार घडला होता. संध्याकाळी गजेंद्र पाटील यांच्यासह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाने अशोक लोदी या आरोपीला कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांच्याकडे सोपविले. याप्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपी करत आहेत (He murdered youth and mixed in crowd but Kalyan GRP arrest in ten days).

हेही वाचा : VIDEO: भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.