संशयित दहशतवादी जानचे 20 वर्षांपासूनचे दाऊदच्या कंपनीसोबत संबंध, तो आमच्या नजरेत होता : महाराष्ट्र एटीएस

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.

संशयित दहशतवादी जानचे 20 वर्षांपासूनचे दाऊदच्या कंपनीसोबत संबंध, तो आमच्या नजरेत होता : महाराष्ट्र एटीएस
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 6:14 PM

मुंबई : देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांचा मुंबईतील लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. पण एवढ्या मोठ्या कटाची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला  कशी मिळाली नाही? असा सवाल काहीजणांकडून उपस्थित केला जातोय. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

विनीत अगरवाल नेमकं काय म्हणाले?

“काल तुम्ही दिल्ली पोलिसांचा पत्रकार परिषद बघितली. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं आहे. त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.

‘जान शेखकडे स्फोटकं आणि हत्यारं मिळाली नाहीत’

“जान शेखने 9 सप्टेंबरा जाण्याचं नियोजित केलं. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले. त्याचं तिकीट कनफॉर्म होत नव्हतं. तर त्याने 13 तारखेचं वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करत तिकीट घेतलं. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनचं त्याने तिकीट घेतलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार. तसेच आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू”, अशी माहिती विनीत अगरवाल यांनी दिली.

‘आमच्या रडारवर 1000 हजार लोक’

1000 हजार लोक आमच्या रडारवर आहेत. आम्ही सतत दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत. मुंबईत रेकी केली नव्हती, मुंबईमध्ये रेकी केली जाईल, असा अंदाज होता, असं अगरवाल यांनी स्पष्ट केलं. तसेच याप्रकरणी आमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. अजून आम्हाला एफआयआर मिळालेला नाही. तो आल्यावर कारवाईचं ठरवू, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय एकही दहशतवादी किंवा त्यांचा साथीदार मुंबईत आला नाही, असंही ते म्हणाले.

उत्सवांचा कालावधी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.

47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मित्र परिवाराला धक्का

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला 12 सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

दिल्ली पोलिसांकडून मित्राचीही चौकशी

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. 13 तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....