‘घटस्फोट दे, नाहीतर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करेन’, राक्षसी पतीकडून धमकी, मुंबईतील संतापजनक घटना

मुंबईतून एक प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने पीडितेकडून साडेपाच लाखांची खंडणी मागितली.

'घटस्फोट दे, नाहीतर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करेन', राक्षसी पतीकडून धमकी, मुंबईतील संतापजनक घटना
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 3:02 PM

मुंबई : पती-पत्नी यांच्यात निरभ्र असं नातं असावं, असं म्हणतात. त्यांनी लग्नावेळी आयुष्यभर जोडीदाराची साथ द्यायची, अशी कमेंटमेंट केलेली असते. प्रत्येक सुखदुखात ते सोबत राहण्याचं एकमेकांना वचनही देतात. अर्थात काही अपवाद वगळता सर्वचजण आयुष्यभर गुण्यागोविंदाने राहतात. काही जोडप्यांमध्ये भांडणं होतात, त्यांचे घटस्फोटही होतात. ते वेगळे राहतात. पण ते विकृत वागत नाहीत. या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण म्हणजे मुंबईत जी भयानक घटना समोर आलीय त्याने पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. संबंधित प्रकरण माहिती पडल्यानंतर एक पती आपल्या पत्नीसोबत इतकं वाईट आणि विकृत कसा वागू शकतो? असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होऊ शकतो.

नेमकं काय घडलं?

मुंबईतून एक प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने पीडितेकडून साडेपाच लाखांची खंडणी मागितली. महिलेने पैसे दिले नाहीत म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या पतीला संबंधित व्हिडीओ पाठवला. पण महिलेच्या पतीने तिला साथ देण्याच्या ऐवजी तो महिलेकडून घटस्फोटाची मागणी करु लागला. “घटस्फोट दे नाहीतर बलात्काराचा अश्लील व्हिडीओ शेअर करेन”, अशी धमकी तो पीडिताला देऊ लागला. अखेर या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी पतीला उत्तर प्रदेशातून बेड्या

आरोपी पती महिलेला सारखा त्रास देत होता. तिने घटस्फोट द्यावा यासाठी तो पीडितेला मानसिक आणि शारीरिकरित्या छळत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तिने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार केली. या दरम्यान पीडित पत्नी पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आरोपीला मिळाली. आपण पकडले जाऊ या विचाराने त्याने घरातून धूम ठोकली. तो त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळगावी श्रावस्ती येथे पळाला. पण पोलिसांनी त्याला तिथे जाऊन बेड्या ठोकल्या.

बलात्कार करणाऱ्या नराधमालाही बेड्या

आरोपी पतीला पकडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. दुसरा आरोपी म्हणजे महिलेवर बलात्कार करणारा आणि त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून साडेपाच लाखांची मागणी करणारा. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत बलात्कार करणाऱ्या नराधमाला देखील बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार, खंडणी सारखे आणखी काही गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींनी मिळून काही कट आखला होता का, त्यांनी पीडितेला नेमकं का छळलं? या सगळ्यांचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती

कॉलेज विद्यार्थिनीच्या घरी सेक्स टॉईज पाठवले, मुंबईत 26 वर्षीय तरुणाला अटक

पुणे वानवडी अल्पवयीन मुलीवर गँगरेप, दोन लॉज मॅनेजर ताब्यात, आरोपींची संख्या 16 वर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.