गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास

कल्याणनजीक भिवंडीच्या बापगाव परिसरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास
गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 5:36 PM

अमजद खान, संजय भोईर, टीव्ही 9 मराठी, कल्याण (ठाणे) : मित्र आपल्या आयुष्याला वेगळं वळण लावतात. मित्र आपल्या चांगल्या वाटेवर नेतात. संकटाच्या समयी धावून येतात. पण भिवंडीत दोन मित्रांनी अल्पवयीन मित्राची हत्या केल्याने मित्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दररोज एकत्र खेळणारी मित्र आपल्याच मित्राचा घात कसा करु शकतात? असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणनजीक भिवंडीच्या बापगाव परिसरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मित्राने दीड तोळे सोन्याच्या चैनीसाठी एका निष्पाप अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पडघा पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलं आहे.

मुलाचा मृतदेह बंद फ्लॅटमध्ये सापडला

कल्याणनजीक बापगावमधील साईधाम कॉमप्लेक्स आहे. या साईधाम कॉम्पलेक्समध्ये राहणारा सोहम एकनाथ बजागे हा काल (14 जुलै) संध्याकाळी अचानक बेपत्ता झाला. सोहमचे नातेवाईक सोहनचा शोध घेत होते. तीन तास शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यानंतर शोध घेत असताना त्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या तळ मजल्यावर बंद प्लॅटमध्ये आढळून आला. त्याच्या तोंडावर स्पंजचे गोठोडे ठेवण्यात आले होते.

मृतक आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा

संबंधित घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लहान मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु झाला. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीनेश कटके यांनी या प्रकरणाची माहिती दिली. “सोहमची हत्या त्याच परिसरात राहणारा अक्षय वाघमारे आणि एका लहान मुलाने केली आहे. हे दोघेही सोहमचे मित्र होते. सोहमच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन होती. त्या दागिन्यावर त्याच्या मित्रांचा डोळा होता. हे दागिने घेण्यासाठी हा प्रकार घडला आहे. सोहम आई वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत”, अशी माहिती दीनेश कटके यांनी दिली (minor youth murdered by his friends for golden chain in Kalyan).

हेही वाचा :

भाड्यासाठी तगादा लावल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या, गळफास घेत स्वत:ला संपवलं

काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.