500 च्या बनावट नोटांचा व्यवसाय करणारा सापडला, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

चुकीच्या मार्गाने पैसे कमवणाऱ्या लोकांचा पापाचा नक्कीच एक ना एक दिवस घडा भरतो. मुंबईच्या मालवणी परिसरातील एका अशाच तरुणाचा पापाचा घडा भरलाय. त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात सापडलाय.

500 च्या बनावट नोटांचा व्यवसाय करणारा सापडला, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 12:01 AM

मुंबई : सर्वसामान्य माणूस दिवसभर प्रचंड मेहनत करुन आपला उदरनिर्वाह भागवतो. प्रत्येकजण दिवसातील आठ ते बारा तास फक्त ऑफिस किंवा आपल्या क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतात. कारण पोटापाण्यासाठी पैसा हा फार महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशांचं सोंग करता येत नाही, असं म्हणतात. पैसा असला तर अनेक प्रश्न सुटतात. आपल्याकडे पैसे योग्य प्रमाणात असतील तर आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. पण काही लोक या गोष्टीला अपवाद असतात. त्यांना शॉर्टकट पैसे हवे असतात. त्यासाठी ते चुकीच्या मार्गाला लागतात. त्यातून ते अनेकांची फसवणूक करतात. पण चुकीच्या नीतीने कमवलेला पैसा फार काळ टिकत नाही, असं मानलं जातं.

चुकीच्या मार्गाने पैसे कमवणाऱ्या लोकांचा पापाचा नक्कीच एक ना एक दिवस घडा भरतो. मुंबईच्या मालवणी परिसरातील एका अशाच तरुणाचा पापाचा घडा भरलाय. त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. पोलिसांना त्याच्याबद्दल खरी माहिती मिळाली तेव्हा ते सुद्धा चक्रावले. आरोपी किती चाणाक्ष पद्धतीने लोकांना फसवत होता हे पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे या तरुणासारखं सर्वसामान्यांना फसवणाऱ्यांचे नक्कीच धाबे दणाणले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील मालवणी परिसरात 500 च्या बनावट नोटांचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्याचे डिटेक्शन ऑफिसर एपीआय हसन मुलाणी यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या होत्या. त्यांना मालवणी परिसरात एका कारमध्ये एक व्यक्ती आला असून त्याच्या हातात काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई सुरु केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीकडून 500 च्या 13 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपी काही दिवसांपूर्वी मालवणी येथे राहायला आला होता आणि त्याने पाचशेच्या अनेक डुप्लिकेट नोटा बदलून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी कोणत्याही दुकानात सामान घेण्यासाठी जायचे आणि पाचशेच्या नोटा देत असत.

उमेश जय किशन कुमार असं अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 32 वर्षे आहे. पोलिसांनी सध्या आरोपीकडून लॅपटॉप, प्रिंटर, कारसह 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.