ईडीच्या चौकशीआधी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार, खडसेंच्या मनात नेमकं काय? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

एकनाथ खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जावं लागणार आहे. मात्र, त्याआधीच खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (NCP leader Eknath Khadse will take press conference before ED Inquiry).

ईडीच्या चौकशीआधी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार, खडसेंच्या मनात नेमकं काय? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 8:12 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. ईडीने पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जावं लागणार आहे. मात्र, त्याआधीच खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे खडसे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे (NCP leader Eknath Khadse will take press conference before ED Inquiry).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थितीत राहावं, असं आवाहन ट्विटरवर करण्यात आलं आहे (NCP leader Eknath Khadse will take press conference before ED Inquiry).

एकनाथ खडसे यांच्या जावायाला ईडीकडून अटक

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी (6 जुलै) 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंची भूमिका

“एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

संबंधित बातम्या :

जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा झटका, ईडीकडून चौकशीचे समन्स

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.