Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छिदवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या डोक्यावरील कर्ज आणि शेतातून काहीच पिकत नसल्याने आर्थिक विषमतेला कंटाळून शेतकऱ्याच्या 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:03 PM

अमरावती : जगाचा पोशिंदा अशी ख्याती असलेल्या शेतकऱ्याची आज काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याला खरंच वेळ आहे का? असा प्रश्न खरंच निर्माण होतोय. राज्यात कोरोनाचं संकट आहेच पण आसमानी संकटांनी जे थैमान घातलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरश: आर्थिक कंबरडं मोडलं आहे. शेतकरी प्रचंड हतबल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकं वाहून गेले, अनेकांच्या शेती वाहून गेल्या. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटामुळे आज शेतकऱ्यांच्या घरात जो अंधार पडलाय त्यात प्रकाश आणण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. कारण आता शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय नैराश्यात जावून फार टोकाचा निर्णय घेत आहेत. अमरावतीत अशीच एक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याच्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी जी सुसाईड नोट लिहिली आहे ती वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

नेमकं काय घडलंय?

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छिदवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या डोक्यावरील कर्ज आणि शेतातून काहीच पिकत नसल्याने आर्थिक विषमतेला कंटाळून शेतकऱ्याच्या 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोसाईड नोट लिहिली आहे. तिच्या आत्महत्येची घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

“मी आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे. माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण आहोत. माझी आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्ज आहे. आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे. माझा भाऊ लहान आहे. माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते. माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी झाले. माझे बाबा खूप काबाडकष्ट करतात. आम्हाला शाळेत पाठवतात. मी कॉलेजमध्ये आहे. मी इयत्ता बारावीमध्ये आहे. मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पैसे नाही. मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे मी स्वतःहून आत्महत्या करतेय”, असं आत्महत्या करणारी अल्पवयीन मुलगी सुसाईड नोटमध्ये म्हणाली आहे.

“माझे आई-बाबा माझ्यावर प्रेम करतात. मी पण माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम करते. मला शाळेमध्ये काही विषय समजत नाही. आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही. आमची लहान पोर आहे म्हणून मी आत्महत्या करते. माझी बहीण कामाला जाते. तिने माझ्यासाठी शाळा सोडली. ही गोष्ट माझ्या मनात खूप घर करुन बसली आहे. माझी आई दररोज कामाला जाते. माझी आई खूप कष्ट करते. मला माझ्या नानीची खूप आठवण येते. लहानपणापासून त्यांच्यापाशी होते. अजून नापास होण्याच्या टेन्शन आहे म्हणून मी जीव संपवतेय”, असंदेखील मृतक मुलीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा :

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.