VIDEO : बाईकवर तिघं आले, दोघांच्या हातात बंदूक, ज्वेलर्समध्ये शिरताच मोठा गदारोळ, सीसीटीव्हीत थरार कैद

रात्रीच्या सुमारास ज्वेलर्सचं दुकान उघडं असताना तीन जण बाईकवर आले. दुकानात ज्वेलर्सचा मालक आणि त्याची पत्नी बसली होती. आरोपी बाईकवरुन उतरले. त्यांना मागेपुढे बघितलं. त्यानंतर ते ज्वेलर्सच्या दुकानात शिरले.

VIDEO : बाईकवर तिघं आले, दोघांच्या हातात बंदूक, ज्वेलर्समध्ये शिरताच मोठा गदारोळ, सीसीटीव्हीत थरार कैद
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 4:51 PM

नागपूर : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हत्या आणि चोरीच्या घटना दररोज समोर येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाक बंगला या परिसरातही अशीच काहिशी घटना समोर आली आहे. तीन तरुणांनी ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकला. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयताही होता. पण ज्वेलर्स मालक आणि त्याच्या पत्नीच्या आरडाओरडला घाबरुन तरुणांनी पळ काढला. हा संबंध प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत संपूर्ण थरार

रात्रीच्या सुमारास ज्वेलर्सचं दुकान उघडं असताना तीन जण बाईकवर आले. दुकानात ज्वेलर्सचा मालक आणि त्याची पत्नी बसली होती. आरोपी बाईकवरुन उतरले. त्यांना मागेपुढे बघितलं. त्यानंतर ते ज्वेलर्सच्या दुकानात शिरले. ज्वेलर्समध्ये शिरताच क्षणी त्यांनी हातातील पिस्तूल काढल्या. दोघांकडे पिस्तूल होत्या. तर एकाकडे धारदार शस्त्र होते. आरोपींना घाबरुन ज्वेलर्स मालक आणि त्याची पत्नी दुकानाच्या आतच्या खोलीत पळाले.

…आणि दरोडेखोर घाबरुन पळाले

ज्वेलर्स मालक आणि त्याची पत्नी आतमध्ये पळाल्यानंतर चोरांनी ज्वेलर्सचं शटर खाली ओढलं. त्यानंतर ज्वेलर्समध्ये चोरी करण्यास सुरुवात केली. ते इकडेतिकडे हात टाकू लागले. यावेळी आतच्या खोलीत गेलेल्या ज्वेलर्स मालक आणि त्याच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे चोरीसाठी दुकानात शिरलेले तरुण घाबरले. बाहेरुन कुणीतरी येऊन आपल्याला पकडेल या भीतीने त्यांनी पळ काढला. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आरोपींचा शोध सुरु

आरोपी घाबरुन पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांचे चेहरे सीसीटीव्ही स्पष्टपणे दिसत नाहीयत. या घटनेनंतर ज्वेलर्स दुकानदाराने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही घेतले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.