VIDEO : नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर
तृतीयपंथी यांच्याबद्दल या पुरोगामी महाराष्ट्रात संवेदना आहेत. अनेक तृतीयपंथी आपल्या मेहनतीवर चांगलं यशही संपादित करत आहेत. मात्र, नाशिकमध्ये एक विचित्रप्रकार समोर आला आहे.
नाशिक : तृतीयपंथी यांच्याबद्दल या पुरोगामी महाराष्ट्रात संवेदना आहेत. अनेक तृतीयपंथी आपल्या मेहनतीवर चांगलं यशही संपादित करत आहेत. मात्र, नाशिकमध्ये एक विचित्रप्रकार समोर आला आहे. काही तृतीयपंथीयांनी मिळून प्रवाशांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही शिंदे टोल नाक्यावर घडली आहे. प्रवाशांनी पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथीयांनी प्रवाशांसोबत वाद घालत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर आज (17 ऑगस्ट) तृतीयपंथीयांचा राडा बघायला मिळाला. शिंदे टोलनाक्यावर तृतीयपंथी जबरदस्ती प्रवाशांकडे पैशांची मागणी करत होते. यावेळी एका गाडीतील प्रवाशांसोबत त्यांनी वाद घालत बाचाबाची केली. तृतीयपंथीयांनी प्रवाशांना शिवीगाळ केली. नंतर तीन ते चार तृतीयपंथीयांनी मिळून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी देखील तृतीयपंथीयांच्या मारहाणीचा प्रतिकार केला. यावेळी दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
हाणामारीत दोन प्रवासी जखमी
विशेष म्हणजे ही हाणामारी सुरु असताना टोल प्रशासन आणि सुरक्षा रक्षक यांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली. तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाला जमिनीवर लोळवत मारहाण केली. या हाणामारीत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित घटना घडत असताना टोल नाक्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यापैकी काही जणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात घटना कैद केली. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ आता व्हायरल देखील होत आहे. या प्रकरणावर पोलिसांनी देखील पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासनाची चुप्पी आहे. दोघांकडून अद्यापही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही.
टोल नाका परिसरात तृतीयपंथीयांचा सुळसुळाट
खरंतय या टोल नात्यावर तृतीयपंथीयांचा सुळसुळाटच बघायला मिळतो. प्रवाशांच्या गाड्या अडवणं, त्यांच्याकडे पैशांची मागणी करणं, पैशांसाठी जबरदस्ती आणि दादागिरी करणं, असा सर्रास प्रकार बघायला मिळतो. या दादागिरी करणाऱ्या तृतीयपंथियांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही. याशिवाय टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक असूनही ते काहीच करत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
हेही वाचा :
पतीनिधनानंतर विम्याच्या रकमेसाठी महिलेचा सासरी छळ, गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न