आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार, पंजाब पोलिसात मोठी खळबळ
क्रिडा विभागाच्या कोट्यातून पोलिसात नोकरी मिळवून देतो, असं आमिष दाखवून एका पोलीस अधिकाऱ्याने नॅशनल वेटलिफ्टिंग महिला खेळाडूवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Police officer rapes national athlete multiple times in Punjab)
चंदिगड (पंजाब) : क्रिडा विभागाच्या कोट्यातून पोलिसात नोकरी मिळवून देतो, असं आमिष दाखवून एका पोलीस अधिकाऱ्याने नॅशनल वेटलिफ्टिंग महिला खेळाडूवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या या आरोपांमुळे पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ज्या महिला खेळाडूने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रातिनिधित्व केलं त्याच महिलेसोबत एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने इतकं किळसवाणं कृत्य करणं संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून दिल्या जात आहेत. संबंंधित प्रकार पंजाबच्या लुधियाना येथे समोर आला आहे (Police officer rapes national athlete multiple times in Punjab).
पीडितेचे पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
पीडितेने पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी पीडितेला नोकरीचं आमिष दाखवून खासगी हॉटेलमध्ये बोलवायचा. तिथे तो लैंगिक शोषण करायचा. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडीओ देखील बनवला. त्यानंतर तो ब्लॅमेल करायचा. अखेर काही दिवसांनी पोलीस अधिकारी खोटं बोलत असून त्याने आपली फसवणूक केली, अशी माहिती पीडितेला कळाली. त्यानंतर तिने आरोपीला विरोध केला. पण आरोपी ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार करायचा, असे गंभीर आरोप पीडितेने केले आहेत (Police officer rapes national athlete multiple times in Punjab).
तपासासाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती
महिला खेळाडूच्या या आरोपांमुळे पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती दिली.
“संबंधित प्रकरण आता समोर आलं आहे. आतापर्यंत आरोपींची पुष्टी झालेली नाही. महिला खेळाडूने केलेल्या आरोपांचा आधी तपास केला जाईल. संबंधित आरोप खरे आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी प्रज्ञा जैन यांनी दिली.
Punjab: A national weightlifting player has accused a police official of raping her several times on the pretext of getting her a govt job in sports quota, in Ludhiana.
“Appropriate action will be taken after verifying the allegations,” ADCP Pragya Jain said yesterday. pic.twitter.com/XYzVt2s1WG
— ANI (@ANI) June 3, 2021
हेही वाचा : नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ