VIDEO : महिलेला सरपटत नेलं, सीसीटीव्हीत थरार कैद, पीडितेचा पिंपरी चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप , पाहा धक्कादायक व्हिडीओ

संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याची शक्ता आहे. या घटनेत पीडित महिलेला एक महिला आणि दोन पुरुष हे सरपटत खेचून रस्त्यावर आणत आहेत. या प्रकरणातील पीडितेने पिंपरी चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

VIDEO : महिलेला सरपटत नेलं, सीसीटीव्हीत थरार कैद, पीडितेचा पिंपरी चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप , पाहा धक्कादायक व्हिडीओ
महिलेला सरपटत नेलं, सीसीटीव्हीत थरार कैद
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 5:51 PM

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादाक बातमी समोर येत आहे. आपलं अपहरण करून सासरच्या लोकांनी इंजेक्शन देऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली. तसेच सासरच्यांनी आपलं अपहरण करत असल्याचा सीसीटीव्ही फूटेजदेखील घेऊन गेलो तरी देखील वाकड पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. पीडितेच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महिलेच्या छळवणूक प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ती तत्काळ दाखल करण्याचे गृहविभागाचे आदेश असताना देखील,वाकड पोलीस एवढ्या गंभीर प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करतायत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलीस आता काय-काय तपास करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, संबधित प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना विचारलं असता, त्यांनी आपण इतर ठिकाणी बंदोबस्तात असल्याने तक्रार घेण्यास थोडा विलंब झाल्याचे सांगितलं. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व तांत्रिक बाबी तपासून तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

सीसीटीव्हीत नेमकं काय आहे?

संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याची शक्ता आहे. या घटनेत पीडित महिलेला एक महिला आणि दोन पुरुष हे सरपटत खेचून रस्त्यावर आणत आहेत. या दरम्यान एक चारचाकी त्यांच्याकडे आणली जाते. या चारचाकीत पीडितेला जबदस्ती टाकलं जातं. पीडिता त्यांचा प्रचंड प्रतिकार करते. पण इतर तिघांसमोर तिची शक्ती कमी पडते. त्यामुळे पीडिताला गाडीत जबरदस्ती बसवलं जातं आणि गाडीचा दरवाजा बंद करण्यात येतो. सीसीटीव्हीच्या माहितीनुसार, ही घटना 19 जूनला दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.