आधी 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आता अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पुण्यात नेमकं चाललंय काय?

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

आधी 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आता अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पुण्यात नेमकं चाललंय काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 6:14 PM

पुणे : पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

दरम्यान, पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबियांनाही सावरण्याचं काम करण्यात येतंय. तसेच पीडितेला न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेवर आता स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपींना थेट फाशीचीच शिक्षा द्या, अशी मागणी काही संतापलेल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पुण्यात आठ दिवसांआधी देखील अशीच घटना

पुण्यात आठ दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान, रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 16 वर गेली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

आरोपींना पोलिसांचा धाक नाही

पुण्यासारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात, त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात, दोन दिवस या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असं मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा : 

पुणे वानवडी अल्पवयीन मुलीवर गँगरेप, दोन लॉज मॅनेजर ताब्यात, आरोपींची संख्या 16 वर

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.